आम्रपालीमधे राजकपूर किंवा दिलीपकुमारची कल्पना पण करु शकत नाहि. कसक ये दिनरात कि म्हणणार्या वैजयंतीमाला शेजारी सुनील दत्तच शोभुन दिसला. मेरा साया मधे पत्नि विरहात तगमगणारा सुनील नैनोमे बदरा छाए मधे कसले आर्त भाव दाखवतो चेहेर्यावर.
वैजयंतीमालाबद्दल काय बोलावं... गाईड वारंवार बघितला त्याचं एक मुख्य कारण वहिदाच.
रातभी है कुछ भिगी भिगी पण एकदम खल्लास.
" रात भी है कुछ भीगी भीगी" हे एक नितांत सुंदर गाणे आहे. ठाकूरसाहेब म्हणतात तसे हे गीत कानांबरोबर नेत्रांनादेखील सुख देते. वहिदाचे अस्सल हैदराबादी मुस्लीम सौंदर्य सुनिल दत्तबरोबर आपल्यालासुद्धा घायाळ करतं. सुनिल दत्त सोबत त्याच्या साथीदारांची (सिद्धू आणि राजेन्द्रनाथ) एक्स्प्रेशन्ससुद्धा मस्त आहेत.
लताबाईंनी तर अतिशय जीव ओतून हे गाणे गायलेले आहे..विशेषकरून "होश मैं थोडी बेहोशी हैं.." ह्या ओळी तर अंगावर काटाच उभा करतात. कोरस जेव्हा "छम छम, छम छम.." म्हणत असतो तेव्हा व्हायब्राफोन आणि मेन्डोलिनच्या कॉम्बिनेशनने एक गूढ माहौल निर्माण होतो.गाण्यातली हार्मोनियमपण एकदम भाव खाणारी आहे. मोस्टली आपल्या शामराव काबळ्यांनींच वाजवली असावी. अरेंजिंग त्यांचंच वाटतंय. तबला गाण्याच्या अंगाने अन कोठ्यावरच्या मैफिलीला साजेसा कुटलाय. लताबाईंचा शेवटचा आलाप पण भन्नाट! कसं जमून गेलंय सगळं !!
लताबाईंनी तर अतिशय जीव ओतून हे गाणे गायलेले आहे..
या चित्रपटातील संगीत जरा हटके वालं आहे. रेश्मा और शेरा तील ' तू चंदा मै चांदनी' प्रमाणेच हे जयदेव लता कॉंम्बो श्रवणीय !
गाणे आवडले,रगेल सुनील दत्त ,आणि वहिदाची आदाकरी भावली, आशीच अदाकारी आसलेले तिसरी कसम सिनेमातले '' यही खाइश है तुम मुझको देखा करो'' गाने आठ्वले , मुबारक बेगमचा आवाज ,वहिदा आणि तिच्या सहकलाकरचा नाच पाहण्या सारखा आहे, इथे ती लिंक टाकून बघतो ,नाहीतर ट्यूब नळी वर आहेच
http://youtu.be/T5w3D9KTWa4
प्रतिक्रिया
****
धन्यवाद :)
Share>>Embed>>
एका अप्रतिम गाण्याचं सुंदर विश्लेषण
मस्त! मस्त!
आपल्याला सुनील दत्त भारी आवडायचा.
अतिशय सुरेख गाणं
खरंच
डॉ दाढेंशी सहमत
सुंदर !!
आभारी आहे
गाणे आवडले,रगेल सुनील दत्त