माझ्या कडेही काही कल्पना उर्जा निर्मितीच्या आहेत. त्यातील एक --
टीव्ही चॅनल वर एक वादाचा विषय रोज असतो. त्यात चार पांच लोक तावातावाने बोलत असतात. त्यांच्या तोंडासमोर एक
अतिसंवेदनशील पातळ पददा असलेले उपकरण लावायचे. त्या पदद्यातून जी हालचाल निर्माण होईल तिच्यावर टर्बाईन चालवायचे व वीज निर्मिती करायची. वाद हे होणारच. मग तावातावाने चर्चा अपरिहार्य. कच्चा माल कायम मिळण्याची सोय आहे.
लेखांना चित्रमय करणे मला नक्कीच आवडेल. पण त्यासाठी ते चित्र आधी कोठेतरी असले तर मिपावर त्याची लिंक देता येते. आवश्यक वाटतील तेथे मी आकृती काढून ती देण्याचा प्रत्यत्न करत असतो. अॅनिमेशन करण्यासाठी माझ्याकडे सॉफ्टवेअर नाही. जालावर शोधून सापडलेल्या चित्रांबद्दल आयपी राइट्सचा प्रॉब्लेम असतो.
आपण खाल्लेल्या अन्नाचे शरीरात पुढे काय काय होते हा वैद्यकशास्त्राचा (मेडिकलचा) भाग आहे. त्या क्षेत्राशी माझा संबंध नसला तरी तेवढे सामान्यज्ञान आहे. मला आता कुठलाही विषय वर्ज्य नसल्यामुळे कदाचित कधीतरी त्याबद्दलही लिहीनही. मागे एकदा मी चक्क रक्ताच्या तपासण्यांबद्दल लिहून बसलो आहे.
प्रतिक्रिया
छान लेखमाला . रोचक आणी माहिती
माझ्या कडेही काही ...
थोढासा गंभीर विषय
हा पण भाग मस्त....
आंदो.. आंदो.. आवड्या.
सुरेख .......
चित्रमय लेख
मूलभूत प्रश्न
आपण खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत होणारे रूपांतर कसे, केंव्हा आणि नेमके कुठे होते?ह्याविशयी जरूर लिहा !वेगळे क्षेत्र
उत्तम
पु.वा..प्र.
पुढील भाग