थोडं थोडं जगून घे
(व्याकरणामध्ये चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे)
"गड्या थोडं थोडं जगून घे"
किती पळशी पैश्यामागे
नको पैश्याचे अरण हे
पैश्यावाचून गरीबाची तू
शांत झोप ती बघून घे
थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे.
बघ आकाशी निळे रंग हे
बघ पक्ष्यांचे खुले छंद हे
एकच पक्षी थव्यातला तो
डोळ्यात तुझ्या भरून घे
थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे.
नकोच विचार वयाचा तो
नकोच विचार भयाचा तो
उरात बालपण भरूनिया तू
मनात दंगा करून घे
थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे.
येतील दु:ख असंख्य कधी
वाहील डोळी नीर नदी
कधीतरी मग अथांग सागर
उधाणलेला बघून घे
थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे.
कधी आनंदाचा पेव फुटता
ओठी ओठ हास्य भेटता
हसत हसत हसत सगळे
डोळे थोडे भरून घे
थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे.
माझे माझे कीती आता हे
माझे माझे नको आता हे
सरणावरती पडण्याआधी
दुसऱ्यासाठी जगून घे
थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे.
वैभव कुलकर्णी
💬 प्रतिसाद
(3)
ज
जेपी
Sun, 12/22/2013 - 10:08
नवीन
आवडल .
- Log in or register to post comments
न
नित्य नुतन
Mon, 12/23/2013 - 08:03
नवीन
सुरेख
- Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ
Mon, 12/23/2013 - 11:12
नवीन
मस्त
- Log in or register to post comments