तू रे पल्याड गोविंदा!
चाल चालले मी
श्वास राहिला पेटता
पाणी उसळले किती
गूढ डोहाने जपता.
जाणत्याला सारे भय
तण माजताना रानी
मस्तवाल झाले मी
त्याने तुला काय हानी?
वाया गेले एक तप
पुढे चालू राही धंदा
तुला नाही सुख दु:ख
तू रे पल्याड गोविंदा!
*अन्यत्र पूर्वप्रकाशित
काय बोलावे! कुठून अशी प्रतिभा येते, कुठून असे शब्द सापडतात, सारेच अनाकलनीय.बोरकर, मर्ढेकर, रॉय किणीकर वाचताना तर हजार वेळा असं वाटतं :-)