खिम्याचे उन्डे
Primary tabs
जे लोक नोन्-वेज खातात त्यान्च्यासाठी
साहित्य:
१ किलो खिमा
१ चमचा आल्-लसुण पेस्ट
३ चमचे लाल तिखट
१/२ चमचा हळद
१/२ चमचा गरम मसाला
१/२ चमचा धने मसाला
मीठ
तेल
कृती:
प्रथम खिमा धुवून घ्यावा. नन्तर दगडी खलबत्त्यात(मिक्सर चालेल) खिमा चान्ग्ले बारीक वाटावे.
नन्तर एका ताटात खिमा काढुन त्यात आल्-लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने मसाला आणि मीठ
घालुन ते एकजीव करावे व त्याचे हाताने गोळे करावे.
आता एका कुकर मधे थोड तेल, (जास्त तिखट खात नसल्यास १ कापलेला टोमाटो टाकु शकता) घालुन फ्राय करावे. मग त्यात हे गोळे टाकावेत. त्यात थोडेसे पाणी टाकुन(फक्त शिजण्यापुरते) कुकर ला २-३ शिटी द्यावी. एकदा का ते शिजले की मग एका पातेलात थोडे तेल घेवुन त्याला फ्राय करावे.
नोटः चपाती बरोबर खाण्यासाठी खिम्याचे उन्डे हे रश्याचे पण बनवता येतात.
अजुन एक की मी फोटो टाकायचा परत प्रयत्न केला पण असफल ....:-(
शाकाहारी लोकांसाठी कशी करता येईल?
शाकाहारी लोकांनी खिम्या ऐवजी सुरण वापरावा.
जिलेबीची पाकृ टाका, कदाचित फोटो टाकण्याचे श्रम वाया जाणार नाहीत ;)
>>प्रथम खिमा धुवून घ्यावा.
बाजारात खिमा थेट मिळतो का?
बाजारात खिमा थेट मिळतो का?>>
अहो , हल्ली ज्याचा खिमा करायचा आहे त्ये बी धुवुन मिळतया ;)
ज्या ठिकाणी 'मटण' हा प्रकार मिळतो तिथे खिमा देखील मिळतो.
'मटण' हा प्रकार कुठे मिळतो?
दुकानात.
दुकानाशी सहमत
कोणत्या?
मटणाच्या.
वासुताई, आवरा आता.
भजी झाली, उंडे झाले आता थोड्या वेळाने सांडगे घालाल.
मेलास कर्माने. बाई येतायेत बहुतेक आता सांडगे घेऊन !! =))))
@आता थोड्या वेळाने सांडगे घालाल.>>>
आयायायायायाया... वेगळच चित्र आलं डोळ्यासमोर! =))
>>आयायायायायाया... वेगळच चित्र आलं डोळ्यासमोर!
देवा!! भटजीबुवांना सद्बुद्धी दे !! *help*
:p
नक्की नक्की वल्ली भाऊ
मला खिम्याचा सॉरी डुआयडीचा वास येतोय .
डुआयडी म्हणजे काय?
म्हणजे मुगाची भजी ;-)
मुगाच्या भजीच्या लेखात तर बरोबर टींब दिलेली आहेत...उदा. कोथींबिर, चिंच, किंवा, ई. आणि ह्याच लेखात मुद्दाम वगळ्लेले दिसते आहे विशेष टिप्पणी मिळाल्यावर...
ताई, बराच त्रास झाला असेल ना असे करायला?
तस नाहिये खर सान्गु तर मी वरचे शब्द (कोथींबिर, चिंच, किंवा) मिपा वरुन कॉपी केलेत.
आवडली पा.क्रु..
सुंदर ... पण फोटो कुठे आहे ?
मी फोटो टाकायचा प्रयत्न केला पण जमलच नाही.
एक अफलातुन चकणा डिश दिली आहे आणि तुम्हि त्यांना "आवरा' म्हणताय! छे नविन उमेदवारांचे असे "उंडे".......ते आपलं "पाय" खाली खेचताना बघुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली.
कश्मीरी पाककलेत जे साग्रसंगीत "वाझवान" चे जेवण असते त्यात असे उंड्यांचे कालवण असते, त्याला "रिस्ता" असे म्हणतात, त्याची आठवण आली
हा पदार्थ फक्त 'सावजी' लोकानमधेच बनतो.
वेल....
मस्तच....
पण फोटो हवा होता
दु.दु. संपादकांचा नवीन सदस्यांना प्रोत्साहन न दिल्याबद्दल निषेध केल्या गेलेला आहे!!!!
(बुवा आतातरी माझ्यावर रागावू नका, अगोबाला दुदु म्हटलोय बघा)