Welcome to misalpav.com
लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:


Comments

हि पाकृ "लेट" टाकुन तुम्हि "पाप" केलय जयवंतराव! बाकि पापलेट आपला जीव कि प्राण. कुठल्याहि डिशच्या रुपात तो आवडतो.

मस्तं बेत आहे. 'ग्लास' आणि पात्रानू मच्छी तसेच तळलेले मालवणी पापलेट हा योग जुळून आला म्हणजे पृथ्वीतलावरंच स्वर्ग अवतरला असा रोमांचित अनुभव म्हणावयास हवा.

अशीच छान संध्याकाळ असावी.आपण बाजार करावा.तो बायकोच्या स्वाधीन करावा.तिने त्यांना तव्यावर घेतले की, सोडा , बर्फ आणि ब्लॅक लेबल ग्लास मध्ये टाकावी.तिकडे ग्रामो फोन वर कुमार गंधर्वांनी सुरांची मैफील जमवावी तर इकडे मच्छीचे ताट समोर यावे. आधी तळलेली आणि दुसर्‍या पेगला भात आणि रश्श्याला सोबत करत यावी.... आणि तिसर्‍या पेगला उगाच आपले तळलेले बोंबील खाता खाता "पे चेक", "यु हॅव गॉट अ मेल" किंवा "वेट अन्टिल डार्क" सारखा सिनेमा बायको बरोबर बघावा..... साधे-सोपे आणि सरळ आयुष्य....

वा..क्या बात.. पण साल.. एवढ साधे-सोपे आणि सरळ आयुष्य असायलाही नशिबच पाहिजे... फक्त आमचा कुमार गंधर्व ऐवजी कैलास खेर असतो... :)

जयनतंत .. मर दाला तुमारे इस पप्लेत्ने. :) मला हलवा पन अवदतो. हलवाला हलद लवुन तेच कलवन करतात. इकदे घाटावर हलवा जासत भेतत नहे.

पात्रानू मच्छी तर अतिशय आवडता प्रकार, तेल न वापरता केलेला मस्त पदार्थ.. :) पटकन परसात जाऊन केळीची पाने तोडून आणली. ती काळजीपूर्वक कापावी लागतात नाहीतर फाटतात म्हणून जमिनीवर पसरुन कापली व ओल्या फडक्याने पुसून घेतली. जर पाने शेगडीवर हलकेच गरम करुन घेतली तर ब-यापैकी मऊ होतात व फाटत नाहीत... (पापल्रेट पंखा ) बजरु... :)

आम्ही कुणाकडे बघायचे..
शेम टू शेम हेच बोल्तो! - (गणपाचा फॅन) सोकाजी

एक नम्बर हो काका..!! वाचूनच तोंडास पाणी सुटलेले आहे.. कुठला तरी मासा खाल्ल्याबिगार आमच्या आत्मास आज शांती मिळणार नाही.

मस्तच दिसतायत! तारकर्लीला घर आहे तुमचं? नशीबवान आहात!

या खाद्य प्रकाराचे नाव"पात्रानु मच्छी " असे नसून "पात्रामा मच्छी " असे आहे. गुजराथीत "नु" हा प्रत्यय "चा ची चे" या अर्थीने वापरला जातो. " मा " याचा अर्थ "मध्ये , आत" अशा अर्थाने येतो. त्यामुळे पात्रामा मच्छी = पानातली मच्छी

"पात्रानी मच्छी" लिंक देत आहे....त्यातील फोटो बघा... https://www.google.co.in/search?q=patrani+macchi&tbm=isch&tbo=u&source=univ&sa=X&ei=dr-5UoOrG8f7rAeS_oC4CQ&ved=0CC0QsAQ (बाय द वे, आज काल , धाग्याला अनावश्यक फाटे का बरे फुटायला लागले आहेत? हे म्हणजे, सचीनने मुद्दाम गहन विचार करून ऑफच्या चेंडूला ऑन साईडला टोलावण्यासारखेच आहे.असो पुर्वीचे मिपा राहिले नाही आता.की काही डु-आयडी मुळे पुर्वीचे मिपा परत आले आहे? कोण जाणे.) वरील प्रतिसाद हा "पैसा ताईंनाच" आहे. "बंडू" लोकांनी ह्यात नाक खुपसू नये.कारण मुद्दाम गहन विचार कर्रुन बंडू मामा काही तरी टंकतात आणि मग पळून जातात, हा नेहमीचा अनुभव आहे.

विजुभाऊ, ही पारशी पाककृती आहे आणि 'पात्रा नी मच्छी' म्हणजे पानांची (पानांत केलेली) मच्छी, हेच नांव आहे. ही केळीच्या पानांत बांधून वाफवतात किंवा कांही पद्धतीत फ्रायपॅनमध्ये तेल टाकून पानांत गुंढाळलेला मासा फ्राय सुद्धा केला जातो. आपल्या पाककृतींमध्ये हळदीच्या पानांत गुंढाळूनही वरील पाककृतीला न्याय दिला जातो.

फोटो काढताना पालापाचोळा जरा बाजूला सारायचा होता हो, म्हणजे आणखी चांगले दर्शन घडले असते... पापलेट आपलेही फेवरेट.. बाकी पाकृ काही वाचली नाही, ते आपले क्षेत्र नाही...

हे राहुनच गेले होते. जबरा.
त्या वेळेचे वर्णन केले तर कमीत कमी दहा पाने तरी होतील
होऊ देत की, तुम्ही लिहिलेला शब्द्न शब्द आम्ही नेहमीच आवडीने वाचतो. लिहाच आता.

+१ (खाण्याबाबत)व्हेज (झालो) असुन फोटो आणि माहीती आवडली..