Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अशाच एका सांज वेळी

प — पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे, Tue, 12/24/2013 - 15:54
अशाच एका सांजवेळी भेट व्हावी आपुली अवेळी एकांत असावा तेव्हा तेथे नसावे कोणी अवतीभवती परतणार्या पक्षांचीही दाटी नसावी अवतीभवती काळोखातही लख्ख दिसावा चेहरा तुझा चन्द्रकोरीसारखा पापण्यांची उघड-झाप असावी जणु चमचमणार्या तारका गार वार्याची झुळुक येईल उब घ्यावीशी तुला वाटेल हातांचा ऊबदार स्पर्श अन् उश्वासांची साथ भेटेल मुकी जरी तु उभी असलीस पैंजण सारे बोलुन जातात चांदण्यात फिरावयास मग पाऊले अलगद चालु लागतात जरी शांतता असली चहुकडे गाणे मनी गुणगुणत असते तालावरती पावलांच्या सतार मनी छेडत असते निरोपाचा क्षण येतो जेव्हा वाट सापडु नये असे वाटते मी हसण्याचा प्रयत्न करतो पाणी तुझ्या डोळ्यात दाटते --- कवि म.ना.दे.

प्रतिक्रिया द्या
1526 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ज
जेपी Tue, 12/24/2013 - 16:12 नवीन
छान कविता .
  • Log in or register to post comments
प
पंडित मयुरेश न… Wed, 12/25/2013 - 12:44 नवीन
आपण जन्माला घातलेल्या मुलाला जेव्हा कोणी चांगल म्हणत तेव्हा खुप बर वाटत. कवितेचही अगदी तसच आहे.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 12/25/2013 - 14:49 नवीन
मस्त कविता आवडली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा