दिवस माझ्या इंजिनियरिंग च्या शिक्षणाचे होते. ९१ किंवा ९२ सालचे. मी नांदेड ला होतो.
हे दिवस तसे मजेचेच असतात. "आम्ही काय कोणाचे खातो रे? तो राम आम्हाला देतो रे" असे म्हणत घरून आलेल्या ६०० रु च्या पत पुरवठ्यावर, नाक वर करून जगण्याचे दिवस. ह्या वयातले पाप्याचे पितर पण पहिलवनला लालकरात फिरत असते. तर ते दिवस होते.
नांदेड चे गवर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेज हे सरकारने ग्रामीण उत थॅना साठी सुरू केले होते. पण मुळे सगळी वेग वेगळ्या यूनिवर्सिटी मधून यायची. त्यामुळे खुद्द नांदेड ची मुले बोटा वर मोजली तरी काही बोटे तशीच उरायाची. बर वय म्हणाल तर "भलतेच बूभुक्षीत" वय असायचे. जेवणावळ दोन वेळचे जेवण द्यायची. पण ते जेवण म्हणजे एवढे तिखटजाळ असे की, मोठी मोठी पोरे पण दोन दोन चपत्यात "नाक पुसत" उठत असत.
तर त्या दिवसात स्नेहनगर एरिया मध्ये एक नवीन हॉटेल म्हणा किंवा मेस म्हणा उघडली होती. त्या माणसाने नीट अभ्यास करून कमी तिखट जेवण, भरपूर दही असलेला रायता चटणी लोणचे असे छान जेवण देण्यास सुरूवात केली. लगेचच नाव सर्वदूर पसरले. आम्ही पण त्याच्याकडे संध्याकाळचे जौ लागलो. थोडे महाग पण चांगले जेवण. पण शेवटी त्याला पण बिज़्नेस करायचा होता. त्याच्या लक्षात आले की पोरे दिवस भर न जेवता सन्ध्याकाळी अवतरायची, आणि पोटात भुजंग शिरअल्या सारखी चरायची. शेवटी त्याने डोके लावले. जेवण अनलिमिटेड पण चपात्या तीनच असा मामला केला. बरे भात फारसा कोणाला आवडत नसे कारण तो अवडावा असा नसायचाच. त्यामुळे बरेचसे भुजंग येई नासे झाले. आम्हाला पण ते जाणवले पण मग आम्ही दोन तीन पोरांनी विचार केला की आपल्याला काय आवडते. कमी तिखट. मग त्याचा आणि चापाती चा संबंध काय? आणि आम्ही लोका भाजीच खायला लागलो. कधी कधी दोन चापात्या आणि भरपूर भाजी आणि डाळ.
तेव्हा ती लागलेली सवय अजुन जाता जात नाही. मला जेवायला बोलावले तर बायको, बोलावणर्याच्या ग्रुहीणीस खास फोन करून सांगते, की बाई गा चापात्या कमी असतील तर चालतील, पण हा माणूस जेवायला लागल्यावर तुमच्या घरच्या भाजीची खैर नाही.
तिचे पण काही चुक नाही म्हणा. शेवटी काय की माणूस हा घडत असतो. कधी परिस्थीतीने तर कधी अनुभवाने.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
छोटा पण मस्त खुसखुशित लेख !
एस्जीजीएस वरुन स्नेहनगरात
अभ्या मी, उदय नगर ला राहायचो. भाग्यनगर च्या जवळ.
मग ओके
काय राव, तुम्ही पण तिकडेच टप्पे टाकलेत की काय?
नाय ओ. आम्ही लैच शाहू
पच्चिमम्हाराश्ट्रच.
खरेच..
लेख हा शब्द विसरला गेला
आणि कुठल्या सवयी मेण्टेन केल्यात साहेब ?
लय भारि
भारी..
खुप आवडला लेख.... कॉलेज चे
मस्त
मस्त लेख....
मस्त! आवडलं!
मस्त...
खर आहे....
आम्ही भुजंग लोकांपैकी एक होतो
आमचीही एक...
अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी to लिमिटेड थाळी