Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तेंव्हा

P — psajid, Fri, 12/27/2013 - 10:28
तेंव्हा स्वप्नांसाठी , जागणारी ‘तळमळ’ वेगळी होती ऊरी भीती हुरहूर , आवडणारी ‘हळहळ’ वेगळी होती ! जीव गहाण खळीसाठी , पैंजनास कान दिला कुंतलात मुख , मन वेधणारी ‘सळसळ’ वेगळी होती ! वीण जोडून वर्तमानी , दाविले भविष्य त्यांनी घेऊन प्राक्तन हाती, वाहणारी ‘कळकळ’ वेगळी होती ! भोवतीचं भान नाही , क्षण एकेक माजलेला बोचलं सुख ज्यांना , वाटणारी ‘खळखळ’ वेगळी होती ! दोष त्यांचाच होता , ज्यांच्या सदाचारी वल्गना पडदा घेऊन द्वेषाचा , भेदणारी ‘मळमळ’ वेगळी होती ! हिरावला मस्तकमोती , "साजीद" घायाळ अश्वत्थामा चौघांसारखी जखम , सलणारी ‘भळभळ’ वेगळी होती ! - साजीद यासीन पठाण

प्रतिक्रिया द्या
1616 वाचन

💬 प्रतिसाद (4)
अ
अभ्या.. Fri, 12/27/2013 - 22:25 नवीन
छान ओ साजिदभाई. मस्त एकदम. आवडली. :)
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 12/28/2013 - 15:34 नवीन
आवडल
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sat, 12/28/2013 - 16:12 नवीन
सुरुवातीच्या ओळींनी अपेक्षा वाढविल्या होत्या. पण यमक जुळवण्यासाठी आणलेले ‘खळखळ’, ‘मळमळ’, ‘भळभळ’ असे शब्द काहीसा रसभंग करून गेले. :-(
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 12/28/2013 - 16:43 नवीन
+१ ती अवतरण चिन्हं तेवढी काढा. बहुदा बराचसा परिणाम कमी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा