बिंब आणि प्रतिबिंब
सहज वाटलं जीवनाची वाट चालताना
एक प्रसन्न, सुंदर, सुगंधित फूल द्यावं तुला
आणि तुझ्याकडे पहातच राहावं, तू ते फूल पहात असताना
आणि मनातल्या मनात सांगत रहावं काळ पुरुषाला
थांब, जरा थांब, अरे थोडासा तरी थांब
का रे सतत घड्याळाचे काटे पुढे ढकलत रहाण्याची घाई तुला?
असेच सतत राहू दे ना पहात मला
बिंब आणि प्रतिबिंब, बिंब आणि प्रतिबिंब
💬 प्रतिसाद