Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भटकंती १

इ
इन्ना
Sun, 12/29/2013 - 10:58
💬 5 प्रतिसाद
भटकंती -१ लहानपणी सायकल चालवता यायला लागली तो माझा पहिला प्रवास! आपापलं, मनसोक्त, अकारण भटकणे!! हळूहळू त्या प्रवासाची म्हणा, अथवा अनुभवाची, चटकच लागली. शाळेतून येताना, पुणे ३० ते गुलटेकडी, रोज नवीन रस्ता असो, वा गडकिल्ले असो, आजीच्या गावाला म्हशींच्या मागे जाणे असो वा शाळेतून गुंजवणी खोर्‍यात विविध उपक्रमांसाठी जाणे असो. मला मनापासून आवडणारी गोष्ट , भटकंती!! वय (महाविद्यालयात प्रवेश) वाढलं (अक्कल नाही) तेव्हां हे सगळं म्हणजे काय नक्की आवडतंय, हा विचार सुरु केला. - ह्यासाठी मेंदू इतका का झिजवायचा - नवीन माणसं /नग /वल्ली भेटतात - नवीन जागा पहायला मिळतात. - असेच भटके लोक भेटतात. - घरी बसलं की अभ्यास हा नावडता विषय हाताळावा लागतो.. अशी आणि इतपत प्रगल्भ (?) उत्तरं मिळायला लागली. पण आर्किटेक्चरला प्रवेश घेतला आणि नितळ दिसायला लागलं. आधीच्या भटकंतीचाही अर्थ उमगायला लागला. अगदी निरुद्देश केलेला प्रवास सुद्धा, थकून टेकल्यावर, रंगीबेरंगी काचा Kaleidoscope साठी देऊन जायला लागला. पाहिलेल्या व्यक्ती, इमारती, चौक, निसर्ग, कल्चर , चाखलेले चित्रविचित्र पदार्थ, ऐकलेले संगीत, माझ्या मनातले अल्बम समृद्ध करायला लागले. काय पहायचं आहे, आणि कसं पहायचं आहे , ह्याच्या लांबलचक विशलिस्टा तयार झाल्या. मनातल्या मनात त्या सफरी करणे हा मस्त विरंगुळा झाला. मग एका टप्प्यावर लिस्ट मधे काही टीकमार्क आल्यावर वाटलं, हे लिहावं. फार नीटनेटकं आणि मुद्देसूद नसलं, तरी जसं मनाला भावलं तसं. Choreographed नाही, तर एकदम साळढाळ गप्पा. (कारण फार छान आणि प्रगल्भ लिहिण्याजोगी अक्कल अजून नाही ) आज एवढंच! पण आता सुरुवात करतेय... महत्वाच्या सूचना: १) फार अपेक्षा ठेवू नयेत. २) हे माझे अनुभव आहेत, आणि माझे रंग. चित्र मला सुंदर दिसतंय , एवढंच. ३) अशुद्ध लेखनाबद्दल क्षमस्व. ४) प्रचि टाकायला जमलं, की पुढे लिहिते. ५) प्रचि साध्या camera ने अथवा मोबाइलवर काढलेत , content more imp than quality.
  • भटकंती २
  • भटकंती ३
  • भटकंती ४
  • भटकंती - ५ लग्नाला गेले मी ओसाकापुरा
  • भटकंती - ६ खेलखेलमें..
  • भटकंती ७
  • भटकंती- ८ तदाओ आंदो
  • भटकंती ८ १/२ - तदाओ आन्दो

Book traversal links for भटकंती १

  • भटकंती २ ›

प्रतिक्रिया द्या
4006 वाचन

💬 प्रतिसाद (5)
क
कंजूस Sun, 12/29/2013 - 12:32 नवीन
आकिटेक्चर हा विषय आहे तर तो संदर्भ ठेऊन भारतातील इमारतींचे सौंदर्य सांगाल तर बरं होईल .उदा हवेली ,मुघल महाल ,ब्रिटिशांचे कोलकाता ,मद्रास वगैरे .एकेक शहरही घ्या .
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sun, 12/29/2013 - 13:01 नवीन
वेगळ्या दृष्टिकोनातून - वास्तुविशारदाच्या (शब्द बरोबर आहे ना? )दृष्टिकोनातून - भटकंती पाहायला आवडेल.
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sun, 12/29/2013 - 18:26 नवीन
लेखनाचे स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 12/29/2013 - 18:44 नवीन
हा अ‍ॅङ्गल आवडल्या गेला आहे. अजून डीटेलवारी लिहायचं बघा तेवढं. :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदराव Mon, 12/30/2013 - 03:59 नवीन

वय (महाविद्यालयात प्रवेश) वाढलं (अक्कल नाही)

हा तुमचा विनयच नाही का?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा