झिंगूनी गुत्त्यात सार्या...
गझलसम्राट सुरेश भटांची माफी मागून "थट्टीफस" निमित्त:
झिंगूनी गुत्त्यात सार्या मी हो नाही बेवडा
दाबले जरी चिकनचिली मज वाटे ते घेवडा
कोण जाणे कोठुनी हे नवे दोस्त आले पुढे
मी असा की जमे "असा" मित्रमेळा एव्हढा
असे ही खिशात माझ्या चपटी औषधापरी
हे कंट्रीचे प्रेम माझे देशभक्त मी हो केव्हढा
कोणत्या इयत्तेत कळेना मी प्यावयास लागलो
अन् कुठे मित्र गेले पुढे मी विकत राहीलो वडा
सांगती गुण माझे सारखे बायको अन् चार पोरे
नवरा माझा दारुडया अन् बाप आमचा बेवडा
न पिणार्यांच्या मध्यरात्री झिंगणारा स्वच्छंदी मी
त्रास नको घरच्यांना म्हणून बाहेर राहतो एव्हढा
पण..
झिंगूनी गुत्त्यात सार्या मी हो नाही बेवडा दाबले जरी चिकनचिली मज वाटे ते घेवडा =)) हे लै खत्तरनाक! =))