Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपाकरलक्षणे समास द्वितीय

स — सस्नेह, Wed, 01/01/2014 - 11:37
मिपाकरलक्षणे समास प्रथम | | श्री मिसळ पाव || | डूआयडीलक्षणनाम समास द्वितीय | मागा सांगितली लक्ष णे | मिपाकरांअंगी बाणे | आता ऐका सोंग घेणे | असोनी येक आयडी |१ | तयां नाव डुआयडी |नामे असती बहु फाकडी | खवतुनी लाडीगोडी | करिती सदा |२| घेई सोंगे कलह लावण्या | जुने स्कोर सेटल करण्या | अथवा उगा मजा बघण्या | आयड्यांची |३| बोली स्त्रीआयडींशी मधुर | मयतरी करण्या अति आतुर | प्रतिसादी जो बहु चतुर | तो येक डुआयडी |४| वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस | कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५| शत्रुआयडीवरी खाय दाढा |संपादकांशी दीन बापुडा | निर्लज्ज ढोंगी पाषाण कोरडा | तो येक डुआयडी |६| काव्य साहित्य ना लेख |काथ्या कुटुनी करी राख | पाकृ चोरी काही येक | दुज्या संस्थळीची |७| संपादक-शत्रू लेखक-शत्रू | कवी-शत्रू कलाकार-शत्रू | बल्लव-शत्रू सुगरण-शत्रू | तो येक डुआयडी |८| आयडीचेनी अष्टगुणे | जया अंगी खोड्या बाणे | सकळांचे काढी उणे | तो येक डुआयडी |९| संयम राखो नेणे कदा | चेष्टा करू पाहे सर्वदा | हसून खिजवी आयडींस सदा | तो येक डुआयडी |१०| बहुतांचे मनींचे तुटे | उगा करी व्यनी खोटे | क्षण बरा क्षणां पालटे | तो येक डुआयडी |११| समस्तांशी मत्सर धरी | बहुतांचे पडीक धागे उकरी | छद्मनामे स्कोर सेटल करी | तो येक डुआयडी |१२| आनंदें आयडी बोलत जेथे | करी वटवट जाऊनी तेथे | खफ आणि खव बळेच मंथे | तो येक डुआयडी |१३| स्त्री आयडींशी सलगी देणे | कंपुंच्या संनिद्ध बैसणे | नव आयडींस उगा खिजवणे | तो येक डुआयडी |१४| काड्या सारुनी कौतुक पाहे | स्मायल्या सोडूनी निवांत राहे | बाजार उठवूनी आपण नोहे |तया गावीचा |१५| ऐसी लक्षणे डूआयडींची असती | बोलिली काही येक यथामती | सावधान असावे श्रोतीं | डूआयडींपासुनी |१६| पारखावी लक्षणे मनीं | आयडी -डूआयडींची दोनी | वावरावे संस्थळी धरुनी | खूण गाठ |१७| ज्ञानार्थ बोलिले लक्षण | असता मिपाकर विचक्षण | पामरें केले परिक्षण | क्षमा केली पाहिजे |१८| इति श्री मिपाबोधे लक्षण परिक्षण संवादे शब्द मेळ साधे समास समाप्त.

प्रतिक्रिया द्या
15281 वाचन

💬 प्रतिसाद (50)
च
चाणक्य Wed, 01/01/2014 - 12:05 नवीन
जोरदार चालू आहे ....येउद्या अजून
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Wed, 01/01/2014 - 14:43 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/02/2014 - 04:01 नवीन
और भी आने दो :) दिलीप बिरूटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
द
दिपक.कुवेत गुरुवार, 01/02/2014 - 07:44 नवीन
सॉल्लीड....अजुन येउ द्या (ओरीजनल आयडिचा) दिपक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पिंगू Wed, 01/01/2014 - 12:24 नवीन
हाहाहा...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 01/01/2014 - 12:32 नवीन
जोरदार बॅटींग येउ दे अजुन.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 01/01/2014 - 13:00 नवीन
झक्कास. हहपुवा.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Wed, 01/01/2014 - 13:08 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 01/01/2014 - 13:20 नवीन
भारीच! तृतीय समास मिपावर रुसला कोपर्‍यात बसला अशा आयडींवर पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 01/01/2014 - 13:24 नवीन
वाह वाह !! ;)
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 01/02/2014 - 10:23 नवीन
>>शत्रुआयडीवरी खाय दाढा |संपादकांशी दीन बापुडा | निर्लज्ज डोंगी पाषाण कोरडा | तो येक डुआयडी |६| हे वाचून मीनाक्षीची आठवण आली. कुठे असेल बिचारी देव जाणे!! *cray2*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ज
जेपी Wed, 01/01/2014 - 13:29 नवीन
आंदो
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 01/01/2014 - 13:32 नवीन
स्नेहा, सॉलिड अभ्यास दिसतो आहे! :)
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 01/01/2014 - 13:33 नवीन
डु आयडीची लक्षणे आवडली. आता ज्येष्ठ सभासदांवर येऊ द्या.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/01/2014 - 14:15 नवीन
मस्त ! और आंदो जल्दी जल्दी !!
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Wed, 01/01/2014 - 14:29 नवीन
ही लक्षणं वाचून आता 'डू आयडी' ओळखता येतोय का ते पाहते :-)
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 01/01/2014 - 14:33 नवीन
दंडवत!
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 01/01/2014 - 14:42 नवीन
आपल्याकडून मूळ दासबोध ऐकणे किती सुखद असावे!
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 01/01/2014 - 15:01 नवीन
डुआय्डीलक्षणनाम द्वितीय समास खूपच आवडला.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 01/01/2014 - 15:23 नवीन
ऐकता ड्वायडीची लक्षणे कुश्चिळ आणि विलक्षणे मारोन फाट्यावर विचक्षणे निद्रेसि भजावे /१/ अथवा घ्यावा तोचि छंद स्वताशी हासोन मंद मंद डुआयडी घेओन स्वच्छंद मिपावरी धुडगुसावे /२/ ऐसा निश्चयो जाहला डुआयडी पाहिजे घेतला तरी योजावे कोणत्या नामाला कळेना जाले /३/ श्रोते पुसती कोण नाम घेता साधेल अवघे काम वाचकासि फुटेल घाम कोण्या नामे /४/ आता असो हे बोलणे सत्वर दुआयडीस घेणे क्रियेवीण काही बोलणे वाचाळता /५/ स्त्रिआयडींची त्सुनामी वर्णिली चित्रगुप्ते नामी दुवा दिला येईल कामी 'इथे' पहावा /६/ http://www.misalpav.com/node/24707
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 01/01/2014 - 17:43 नवीन
लगे रहो चित्रगुप्तभौ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
प
पैसा Wed, 01/01/2014 - 15:37 नवीन
लै भारी! थांबू नको. लिहीत रहा!!
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Wed, 01/01/2014 - 16:47 नवीन
फर्स्ट क्लास!!!!
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 01/01/2014 - 16:50 नवीन
अगाईगं. च्यायला त्या अमेरिकेचा जीडीपी कितीही होवो, जोपर्यंत चित्रगुप्त साहेबांसारखे लोक आमच्या देशात आउटपुट देताहेत तोपर्यंत आमचेच जीवनमान उच्च.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/01/2014 - 16:51 नवीन
__/|\__ Image removed. आफाट मारलय धरून! पहिले सहा बाण तर इतके बेकार खोल मारलेत की क्या केहेने? Image removed. रक्तबंबाळ..रक्तबंबाळ केलय अगदी!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 01/01/2014 - 17:13 नवीन
मस्त. मजा येतेय वाचायला.
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 01/01/2014 - 17:40 नवीन
ए अजून अजून.... =))
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 01/01/2014 - 19:04 नवीन
:D :))
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 01/02/2014 - 05:33 नवीन
खतरनाक. आता दृष्ट्रांत येवूद्यात.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 01/02/2014 - 05:55 नवीन
वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस | कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५| या आणि ईतर रचना म्हणजे: वेचूनी शब्द किमान| आशय फेडे तुमान| टवाळ घुसखोरांचा पर्दाफाश |डु-आयडींचा परामर्श ठायी ठायी |
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 01/02/2014 - 05:57 नवीन
लगे रहो चित्रगुप्तभौ !+१
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 01/02/2014 - 05:57 नवीन
झकास्स्स !
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 01/02/2014 - 06:55 नवीन
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद..!! ( हॅ हॅ हॅ )
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 01/02/2014 - 10:45 नवीन
धन्यवादासाठी मा. संपादकांचे धन्यवाद ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
नित्य नुतन गुरुवार, 01/02/2014 - 06:57 नवीन
दंडवत ___/\___ *clapping*
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 01/02/2014 - 07:10 नवीन
झकासच
  • Log in or register to post comments
म
मारकुटे गुरुवार, 01/02/2014 - 07:16 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments
व
वासु गुरुवार, 01/02/2014 - 07:25 नवीन
वा वा... वा वा
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 01/02/2014 - 07:45 नवीन
अगो.... सांभाळून हो! (परिक्षण अम्मळ गंडलंय. खर्‍या आयडींची लक्षणं देऊन डुआयडी म्हणताय काय? ;) )
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 01/02/2014 - 10:10 नवीन
खर्‍या आयडींची लक्षणं देऊन डुआयडी म्हणताय काय?
नै रे प्यारेभौ, ते डुआयडी मेले अगदी बेमालूम आहेत बघ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/02/2014 - 08:37 नवीन
हाही भाग जबरीच!!! पण काही थोडं रिपिटिशन दिसतंय, हा डुआयडीचा परिणाम तर न्हवे ;)
  • Log in or register to post comments
य
यसवायजी गुरुवार, 01/02/2014 - 09:09 नवीन
डुआय्ड्या लै वेंजॉय करत्यात काय?? म्या बी एक ऐडी घेतुच आता... ;)
  • Log in or register to post comments
म
मारकुटे गुरुवार, 01/02/2014 - 09:32 नवीन
जरा एकदा दत्तोबांवर पण लिहा
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 01/02/2014 - 10:14 नवीन
तो अधिकार हभप प्यारेमहाराजांचा ! (ते एकटेच हात धुवून मागे लागलेत तर दत्तगुरु परेशान झालेत. आम्ही लागलो तर गुप्तच व्हायचे...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
म
मारकुटे गुरुवार, 01/02/2014 - 10:16 नवीन
दत्त दत्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
प्यारे१ गुरुवार, 01/02/2014 - 11:19 नवीन
१४ नुकतंच उजाडलंय. का त्रास देताय गरीबाला? ३६३ दिवस जायचेत अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
म
मारकुटे गुरुवार, 01/02/2014 - 11:59 नवीन
जातील जातील दिवसच ते जातील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
सुहास.. गुरुवार, 01/02/2014 - 11:25 नवीन
मुळात प्यारे१ हा हभप बाबा सातारकर महाराजांचा ड्यु आयडी आहे ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 01/02/2014 - 13:14 नवीन
नामा, नामा... असं कसं बोलतोस रे???? हम्म्म! कळ्ळं का काय सांगितलं त्ये? बाबामहाराजांची काय ती रसाळ वाणी महाराजा. एकदा ऐकावं नि ऐकतच रहावं. राम क्रिष्ण हरि|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
प
प्रीत-मोहर Fri, 01/03/2014 - 05:06 नवीन
मस्स्स्स्स्त!!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा