Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पंजा माझा

म — मंदार दिलीप जोशी, Sun, 01/05/2014 - 09:47
हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वतःचाच पंजा खूप भिववतो वर्षानुवर्ष विश्वासलो ज्यावर तोच हल्ली घाबरवतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वत:चाच पंजा खिसा कापतो दोन भा़ज्या जास्त खातोस रे हावरटा असे म्हणून धमकावतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वतःचाच पंजा चिडवतो गाडी घेतलीस काय रे साल्या म्हणून हळुच इंधनाचे दर वाढवतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वतःचाच पंजा हिणवतो ९५ टक्के मिळाले का रे तुझ्या पोरांना म्हणत ५०% वाल्याला डोक्यावर बसवतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वतःचाच पंजा गंध पुसू पाहतो नारळ फोडतोस का रे भाड्या म्हणत लगेच अंधश्रद्धेचे लेबल लावतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वत:चाच पंजा गळफास लावतो कधी शेतावर तर कधी शहरात आत्महत्या करायला लावतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वत:चाच पंजा वस्त्र फेडतो दिवस-रात्र-जात-धर्म निरपेक्ष अब्रूहीन जगायला लावतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वत:चाच पंजा फितुर होतो कधी स्वकीयांवर अत्याचार तर कधी परक्यांना 'आधार' देतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वत:चाच पंजा माझा इतिहास पुसतो माझी तलवार म्यान करुन इतरांची दाढी कुरवाळतो हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते हल्ली स्वतःचाच पंजा धमकावतो ताई माई अक्का म्हणत म्हणत दर पाच वर्षांनी फसवतो --------------------------------------------------- पण आता नाही घाबरणार पंजाला नाही जुमानणार निरुपयोगी अन् त्रासदायक अपेंडिक्ससारखे त्याला कापून काढणार --------------------------------------------------- - मंदार ०५.०१.२०१४ पौष शु. ५, गुरु गोविंद सिंग जयंती

प्रतिक्रिया द्या
3665 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
पैसा Sun, 01/05/2014 - 11:47 नवीन
:) पण खराटा धरायला पंजाच लागतो ना भौ? ;)
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Sun, 01/05/2014 - 11:50 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/06/2014 - 15:19 नवीन
मग कमळाकडे पाहा. बाकी, मंदारशेठ अजून येऊ द्या सुंदर कविता. इतनी मिलती है मेरी गजलो से सूरत तेरी लोग तुझ को मेरी महबूब समझते होंगे.- बशीर बद्र.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 01/08/2014 - 18:39 नवीन
कमळा दिसायला कशी आहे हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बर्फाळलांडगा Wed, 01/08/2014 - 07:49 नवीन
.
  • Log in or register to post comments
द
दर्यावर्दी Wed, 01/08/2014 - 08:20 नवीन
तुमचा पंजा तूमी कापल्यानंतर तूम्ही किती गोष्टींना मूकणार आहात याचा फक्त विचार करुनच मी सुन्न झालो आहे... असो, गरज लागली तर माझा पंजा उधारीवर द्यायला मी तयार आहे.
  • Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा Wed, 01/08/2014 - 08:24 नवीन
अग्गागा! वार्ल्या गेलो आहे coz I don't think it's legal anymore
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दर्यावर्दी
द
दर्यावर्दी Wed, 01/08/2014 - 08:27 नवीन
काय रे बॅट्या तू लांडगा कधी झालास?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा
ब
बर्फाळलांडगा Wed, 01/08/2014 - 08:36 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दर्यावर्दी
त
तिमा Wed, 01/08/2014 - 08:21 नवीन
आपल्या हाताचाच काय,वाघाचा पंजाही आताशा घाबरवतो! इंजिन अंगावरुन जाईल अशी भीति वाटते, हत्तीच्या पायी देतील अशी भीति वाटते, कमळातला भुंगा कानांत शिरेल अशी भीति वाटते आणि या सर्वांपासून दूर पळावे म्हणून झाडू हाती घ्यावा तर त्याचे 'हीर' नाकांत घुसतील अशी भीति वाटते.
  • Log in or register to post comments
द
दर्यावर्दी Wed, 01/08/2014 - 08:26 नवीन
मुळव्याधीवर एक कमलतैलमोदम नावाचे जालीम औषध आहे ,रोज लावत चला.
  • Log in or register to post comments
स
सचीन Wed, 01/08/2014 - 10:36 नवीन
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दर्यावर्दी
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 01/10/2014 - 06:42 नवीन
एक स्मायली राहिली वाटतं!! न्हाय मंजी धा तोंडाच्या धा बऱ्या असतात, कसं? ह्याह्याह्या….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन
प
प्यारे१ Fri, 01/10/2014 - 12:33 नवीन
एक तोंड 'आलं' असेल. ;) तोंड आल्यावर हसताना त्रास होतो. तोंड येण्याचं एक कारण ... असतंय काहीतरी! शाला शब हम बतायेगा तो टुम क्या करेगा? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
स
सचीन Fri, 01/10/2014 - 16:13 नवीन
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:*lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
म
मदनबाण Wed, 01/08/2014 - 10:44 नवीन
कविता आवडली...
  • Log in or register to post comments
स
सचीन Wed, 01/08/2014 - 12:04 नवीन
नवल आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
सचीन Fri, 01/10/2014 - 16:14 नवीन
कोण हे फडणवीस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मुक्त विहारि Wed, 01/08/2014 - 17:41 नवीन
छान आहे... आवडले.
  • Log in or register to post comments
उ
उद्दाम Fri, 01/10/2014 - 11:09 नवीन
मायबोलीच्या पंजाने अर्धचंद्र दिलेले ते तुम्हीच का? :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा