Welcome to misalpav.com
लेखक: नानीचा नाना | प्रसिद्ध:
नाना ची मनी ( सनी) आम्ही सनी घेतली तेव्हा ती आमच्या सोसायटीतील ४८ सभासदांपैकी ३ री स्कूटर होती . यथासांग पूजा करून आम्ही आमच्या सनीचे स्वागत केले . त्यावेळी माझी मुलगी ७ - ८ वर्षांची असेल . तिला आमच्या सनी बद्दल अतिशय अभिमान होता . दर शनिवारी तिला मी स्नीवरून शाळेत सोडत असे. तेव्हा इतर मुलांसमोर स्वतः च्या सनी वरून चढण्या - उतरण्याचा तिचा रुबाब काही औरच होता . यथावकाश मला मुलगा झाला . तो तर सनीच्या मधल्या भागात धरून हरून उभा राहायला शिकला आणि इयत्ता ६ वीत जाईपर्यंत तो सनी चालवू लागला आमची सनी म्हणजे ' मूर्ती लहान पण कीर्ती महान ' अशी होती . वांद्रे ते दादर पर्यंतच्या भागात सनी वर मी , नानी तिच्या मांडीवर माझा लहान मुलगा व मधल्या भागात माझी मुलगी उभी असे फिरताना बर्याच जणानी बघितले आहे . पाठीवर एवढे वजन घेऊन प्फिरताना तिने कधीच कुरबुर केली नाही . तिला कधीच उन पावसाचा त्रास झाला नव्हता , त्यामुळे जवळ जवळ ११ - १२ वर्षात तिला कधीच डॉक्टर कडे (मेकेनिक )न्यावे लागले नाही . या ११ - १२ वर्षात वाहनाचे चाक पंक्चर होते हे मी विसरून गेलो होतो . परंतु २६ जुलै २००५ ला सनी ला स्टेशन जवळ ठेवले होते. त्यादिवशी च्या न भूतो न भविष्याती अशा पावसामध्ये तिच्या आजूबाजूला उभे असलेले तिचे भाऊ बहिणी ( इतर स्कूटर / मोटर सायकल ) इतस्त: पडलेल्या होत्या पण ही मात्र ताठ मानेने उभी होती . परंतु पूर्णपणे पाण्यात १ दिवस राहिल्यामुळे तिला बराच त्रास झाला व डॉक्टरांना (मेकानिक ) तिची मोठी शस्त्रक्रिया (दुरुस्ती ) करावे लागले . थोडे दिवस आराम केल्यावर तिची पुन्हा घर ते स्टेशन अशी दौड सुरु झाली आमची कार आल्यावर आम्ही मोटारीला 'मोठी' आणि सनीला 'छोटी' अशी नवे दिली . यानंतर बर्याच स्कूटर घेतल्या पण अजूनही सनीचे गुणगान करावेसे वाटते . नानीचा नाना
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

शिर्षक वाचुन वाटले की नानाच्या मनात असलेल्या सनी लिओने बद्दल काही सुरस कथा वाचायलामिळेल म्हणुन... असो.

है शाबास!!!! आमच्या सारखे आमच्या रॉयल एन्फिल्डा अन सी बी झेडांचे कौतिकं करणारे असतात पण हे सनीवरचे नितांत प्रेम पाहीले आपले अन एकच म्हणावे वाटले नाना बापुचा सलाम घ्या!!!!!!

स्कूटरवर प्रेम वगैरे समजु शकतो. पण.... >>>> इयत्ता ६ वीत जाईपर्यंत तो सनी चालवू लागला हे अत्यंत चुकीचे आहे. मुलं १८ वर्षाची होई पर्यंत त्यांना असे वाहन चालवायला देणे घातक ठरू शकते. त्या मुलासाठीही आणि इतर पादचार्‍यांसाठीही.

पहिली गाडी नेहमीच मनात राहते. मस्त :) अवांतर: एका दैनिकात 'लुना' वर प्रेम करणाऱ्या एका सुकुमार ब्रह्म तरुणाची कथा खूप फ़ेमस आहे. त्याची आठवण झाली. :yahoo:

तो बुवांचा किस्सा एथे द्या ना गडे

बॅटन्....श्लेष अलंकारासाठी बॅटमनांकडे देण्यात येत आहे. योग्य* शब्दातील अंतर सुयोग्य राखून अर्थ मर्यादीत ठेवल्या बद्दल.

म्हाग्रु आनी तेंची बायकुचे नाय आटवले का? चला ना चला ना....... चला ना गडे !

सनी च्या {दुचाकी हो... }आठवणींचा प्रवास आवडला. वांद्रे ते दादर पर्यंतच्या भागात सनी वर मी , नानी तिच्या मांडीवर माझा लहान मुलगा व मधल्या भागात माझी मुलगी उभी असे फिरताना बर्याच जणानी बघितले आहे . अशी सर्कस दिसली की लोक पाहणारच ! ;) कॄपया हा तिरकसपणे मारलेला शेरा आहे असे समजु नका. दुचाकीवर २ व्यक्तींनीच प्रवास करावा.असा धोका दायक प्रवास करुन आपण आपल्यांचे जीव धोक्यात तर घालतोच शिवाय इतरांचे जीव सुद्धा टांगणीवर लावतो.आधीच आपल्या देशातील रस्ते इतके दिव्य आहेत की मौत का कुवा मधे सुद्धा दुचाकी गरागरा फिरवणे अधिक सुरक्षित वाटावे. जाता जाता :- माझ्या एका दक्षिण भारतीय मित्राची अशी एक सनी होती.त्याचे तिर्थरुप ती सनी घेउन हापिसात जात्.तिर्थरुप जरा चांगल्या तब्येतीचे होते,मित्र कधी कधी चेष्टेने मला सांगायचा की त्याला त्याच्या वडिलांचा सनी वरुन केलेला प्रवास आवडत नाही.तो म्हणायचा की त्याच्या वडिलांचा हा सनी प्रवास म्हणजे हत्तीने डासावरुन केलेला प्रवास वाटतो ! ;) शेवटी त्यांनी ४ चाकी घेतली.

ही सनी जेव्हा मार्केट ला आली तेव्हा मी बजाज आटो मधेच काम करत होतो. तिचे सांकेतिक नाव अल्फा असे होते. आणि त्यानंतर आली ती बेटा.. स्कूटर ! ही सिरीज जरा हटके होती. त्या सनीवर प्लास्तिकचे पार्ट होते आणि ते रंगवताना कमालीचा त्रास व्हायचा ! त्या पेंटींग लाईनला "शनी लाइन" असे म्हट्ले जात असे !त्यावेळी प्लास्तिक पेंतिंग आव्हानात्मक होते. असो .. हमारा बजाज च्या आठवणीने डोळे पाणावले..

मुळ म्हण ताकाला जाऊन भांडे लपवू नये अशी आहे . त्यामुळे भानड्याला जाऊन ताक लपवण्यासारखे आहे या वाक्याचा अरथ आणि त्याचा इथला संबंध कृपया विशद करून सांगितला तर बरे होईल .

माझ्या वडीलान्कडे हीच सनी होती...*smile* :-) :) +) =) :smile: जुन्या आठवणी जाग्या झाल्या... छोटासा आणि मस्त लेख.. *ok* *OK* पुलेशु..!!