Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सावळ्या तुझ्याविना...

आ — आनंदमयी, Sun, 01/05/2014 - 15:19
सख्या कधीच लोपली मधाळ धुंद बासरी तरी अजून गुंजते मुकुंद नाम अंतरी अबोलशी पहाट ही उदास रे तुझ्याविना अजून सांज सावळ्या, शोधते तुझ्या खुणा सुनी सुनीच वाहते सुनी नदी सुन्या तिरी अजून माय साठवी घटा घटात क्षीर रे अधीरता मनात त्या लोचनांत नीर रे अशांत ती पुकारते फिरून ये पुन्हा घरी पूर्णतः प्रसन्न मी उदास गोकुळात या मनात हर्ष-शोक ना, पल्याड मी हरीप्रिया! कशास शोधु रे वृथा, मनात या वसे हरी... अदिती

प्रतिक्रिया द्या
4944 वाचन

💬 प्रतिसाद (31)
प
प्रचेतस Sun, 01/05/2014 - 15:22 नवीन
सुरेख. बाकी शीर्षक पाहून 'गाढवाचं लग्न' मधील सावळ्या कुंभार आणि गंगी डोळ्यांसमोर तरळून गेले. प्रकाश इनामदारांनी अजरामर केलंय सावळ्याला.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 01/05/2014 - 15:22 नवीन
वा, सुरेख!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sun, 01/05/2014 - 15:29 नवीन
अतिशय सुरेख रचना. अगदी तालात म्हणून पाह्यली. :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Sun, 01/05/2014 - 15:40 नवीन
धन्यवाद! :) .................................
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/05/2014 - 15:46 नवीन
व्वा..व्वा..व्वा..व्वा..व्वा..! Image removed.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sun, 01/05/2014 - 15:58 नवीन
आवडली. मनात हर्ष-शोक ना, पल्याड मी हरीप्रिया! पूर्णतः प्रसन्न मी उदास गोकुळात या या दोन ओळींचा क्रम बदलून मला त्या अधिक परिणामकारक वाटल्या. अवांतरः 'नदि' शब्द वृत्तासाठी असा घेतलाय का? तो थोडा खटकला - 'नदी' असा करता येईल का तो?
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Sun, 01/05/2014 - 16:15 नवीन
नाही तो टायपो होता. मलाही कविता पोस्ट केल्यावर लक्षात आलं.. पण पोस्ट एडिट कशी करायची ते कळत नाहीये..! :( .........................................................
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 01/05/2014 - 17:11 नवीन
एकदम नादमय झालीये. खूप आवडली
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 01/05/2014 - 18:23 नवीन
छान वाटतेय वाचताना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
प
प्यारे१ Sun, 01/05/2014 - 17:22 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Sun, 01/05/2014 - 18:05 नवीन
धन्यवाद!! माझी कविता संपादित केल्याबद्दल...पण शेवटच्या कडव्यातल्या ओळींची रचना बदलणं अपेक्षित नव्हतं!! मला फक्त 'नदी'तला 'दि' दीर्घ करायचा होता...!!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sun, 01/05/2014 - 18:29 नवीन
डन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदमयी
प
पैसा Sun, 01/05/2014 - 18:32 नवीन
फार छान!
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sun, 01/05/2014 - 18:34 नवीन
माफ करा, आणखी एक, 'तिरी'चं 'तीरी' हवंय. संपादकः दुरुस्ती केल्यावर (धागाकर्तीला ती दुरुस्ती मान्य असल्यास अर्थात) हा प्रतिसाद काढून टाका ही विनंती.
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Sun, 01/05/2014 - 18:41 नवीन
मीटर मध्ये बसावा म्हणून 'ति' ह्रस्व लिहिलाय.... :) ..........................................................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
इ
इन्दुसुता Sun, 01/05/2014 - 18:38 नवीन
अत्तिशय आवडली...
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Sun, 01/05/2014 - 20:34 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्दुसुता
आ
आनंदमयी Sun, 01/05/2014 - 18:43 नवीन
मनापासून धन्यवाद.... :)
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Mon, 01/06/2014 - 02:49 नवीन
तुमची कविता आणि तुमची स्वाक्षरी दोन्ही आवडल्या. अप्रतिम!
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 01/06/2014 - 05:46 नवीन
कविता आवडली...
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Mon, 01/06/2014 - 06:38 नवीन
:) अगदी मनापासून धन्यवाद..... ..........................................................
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 01/06/2014 - 08:10 नवीन
सुंदर अतिशय सुंदर, मनापासून आवडली. सहज गुणगुणता येते चालीत त्यामुळे लक्षातही रहाते आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Mon, 01/06/2014 - 09:25 नवीन
:) :) :) धन्यवाद..... .........................................................
  • Log in or register to post comments
M
michmadhura Mon, 01/06/2014 - 10:14 नवीन
कविता खूप आवडली.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Mon, 01/06/2014 - 15:53 नवीन
मला पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: michmadhura
आ
आनंदमयी Mon, 01/06/2014 - 15:00 नवीन
:) धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Mon, 01/06/2014 - 15:09 नवीन
मनापासून आवडली..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/06/2014 - 15:27 नवीन
सुरेख....अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 01/06/2014 - 15:45 नवीन
खलास पूर्ण जाहलो, कवित्व येथ वाचता | सुवृत्त काव्य, शब्दही, तसे अचूक योजिता | मजा बहूत येतसे, पढोनि वा म्हणोनि वा | कितीक दीस भासली, हिची जणूचि वानवा ||
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Mon, 01/06/2014 - 17:58 नवीन
खरेच धन्य जाहले सुनोनि काव्य कौतुके वसोत स्नेहशब्द हे मनामनांत सारखे.... :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
आ
आनंदमयी Mon, 01/06/2014 - 18:01 नवीन
अगदी मनापासून धन्यवाद..... ..........................................................
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा