Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नविनच

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Tue, 01/07/2014 - 08:09
पावसात भिजूनही मी कोरडाच राहणे हे जरा नविनच होते चिंब होऊनही मी धुंद न होणे हे जरा नविनच होते . हा कुठला नवा खेळ? . दाटून येता 'तो' जीव असा हुरहुरतो 'तो' येताच दारचा निशिगंध बहरतो ढग फुटून 'तो' असा काही बरसतो त्या गंधाने मी आकंठ मोहरतो . नेहमी हा पाऊस येतो आणि मी शुद्ध हरवतो सचैल भिजून भान हरपतो कोसळणाऱ्या मेघधारांनी माझे सूर भिजतात हृदयात मेघमल्हाराची गाज उमटू लागते मनात वसंत रुंजी घालाया लागतो मग आजच असे का व्हावे? . हा वर्षाव कोरडा का वाटावा कां आज मी ओथंबत नाही नेहमीसारखा . . हम्म... आज ह्या पावसाची दिशाच चुकली होती तो तुझ्या घराला टाळून आला होता हे जरा नविनच होते.... नविनच... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (एक जुनी रचना)

प्रतिक्रिया द्या
5202 वाचन

💬 प्रतिसाद (19)
प
प्रचेतस Tue, 01/07/2014 - 08:19 नवीन
नेहमीप्रमाणेच झकास रे मिका.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 01/07/2014 - 08:37 नवीन
:)
  • Log in or register to post comments
M
michmadhura Tue, 01/07/2014 - 08:40 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Tue, 01/07/2014 - 08:46 नवीन
नेहमीप्रमाणेच छान रचना
  • Log in or register to post comments
अ
अमेय६३७७ Tue, 01/07/2014 - 08:50 नवीन
छानच
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 01/07/2014 - 09:13 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 01/07/2014 - 09:52 नवीन
प्रतीसाद ६ च हे नविनच... कवीता मात्र "दिल खुश" आहे
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 01/07/2014 - 09:53 नवीन
मिका.. रचना जुनी आहे हे कळतंय.. !! ठीकठाक.
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Wed, 01/08/2014 - 03:14 नवीन
छान आहे रचना... आवडली.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 01/08/2014 - 03:38 नवीन
हे एक आणखी उदाहरणार्थ नविनच वगैरे. आवडले.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 01/08/2014 - 06:10 नवीन
काही गोष्टी जुन्या होतच नाहीत. स्मृतीतून जगाकडे पाहायची सवय सोडली तर सगळं नवं असतं. तसा हा पाऊस. जगजीतची एक गज़ल आहे : दुनिया जिसे कहेते है जादूका खिलौना है, मिल जाए तो मिट्टी है, ...खो जाए तो सोना तुझ्या कवितेच्या आशयाशी संगती सांगणार्‍या, गज़लेतल्या या ओळी आठवल्या: बरसातका बादल तो दिवाना है क्या जाने किस छत को भिगोना है,... किस राहसे बचना है दुनिया जिसे कहेते है जादूका खिलौना है।
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Wed, 01/08/2014 - 06:48 नवीन
प्रतिसाद आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
त
तिमा Wed, 01/08/2014 - 07:09 नवीन
कवितेचा आशय आवडला. पण नेहमीचे 'फिनिशिंग' वाटले नाही. थोडीशी विस्कळीत वाटली.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Wed, 01/08/2014 - 07:29 नवीन
हेच लिहायला आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ब
बॅटमॅन Wed, 01/08/2014 - 12:29 नवीन
यग्जाक्टली!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
स
सस्नेह गुरुवार, 01/09/2014 - 09:01 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 01/09/2014 - 11:38 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 01/15/2014 - 06:24 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
फ
फिझा Mon, 01/20/2014 - 23:35 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा