Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अपेक्षा

म — मि मिपाचा मित्रच, Fri, 01/10/2014 - 08:38
नमस्कार माझा मिपा वर हा प्रथमच लिहिण्याचा प्रयत्न .. काय लिहावे असा विचार करत असताना वृद्धाश्रम वरील शतशब्द कथा वाचली आणि खालील कविता - संग्रही असलेली - आठवली ,कविता खूप जुनी आहे, मी लिहिलेली नाहीय - पण भावना पोहचवण्या साठी अश्या गोष्टींची गरज नसते.. स्वतःचे लिखाण नसेल तर ते मीपा वर टंकता येते कि नाही हे माहित नाही, हि कविता या आधी मिपा वर पूर्व-प्रकाशित झाली आहे कि नाही ते पण माहित नाही. जर अशी परवानगी नसेल किंवा पूर्व प्रकाशित असेल तर आधीच क्षमस्व. !! अपेक्षा !! आपल्या आईला किंवा बाबांना वृद्धाश्रमाच्या दारात नेऊन ठेवताना जरा थांबा & आठवा - हिनेच ना प्राणाशी झगडून तुम्हाला जन्म दिला रात्रीचा दिवस आणि तळहाताचा पाळणा करून, आजारपणे तिनेच काढली ना ?? स्वतःचे दुध पाजून, स्वतः रांधूनच वाढवले ना ?? पहिले पाऊल टाकताना अडखळला , तेव्हा तिनेच पकडून सावरले ना ?? पहिला शब्द तिनेच शिकवला ना ?? शाळेच्या पहिल्या दिवशी, तुमचे चिमुकले बोट सोडवून घेऊन, तुम्हाला आत पाठवले तेव्हा, कासावीस होऊन शाळेच्या दाराशी तीच उभी होती ना ?? पहिले बक्षीस तुम्ही घेतले तेव्हा, गर्दीमध्ये एका कोपरयात उभी राहून, पदराने तिनेच डोळे पुसले ना ?? तुमच्या प्रत्येक यशात आणि अपशायात, ती हसली आणि रडली ना ?? मग आता जेव्हा तिला आणि हो, वडिलांनाही, तुमची खरेच गरज आहे, तुमच्या आधाराची अपेक्षा आहे, तेव्हा तुम्ही आपले हात सोडवून घेणार ?? घेऊ शकाल ??

प्रतिक्रिया द्या
1155 वाचन

💬 प्रतिसाद (1)
म
मारकुटे Fri, 01/10/2014 - 08:52 नवीन
काव्यरस: aai baba नवीनच प्रकार म्हणायचे की काव्यरसाचे? आणखी कोणते होऊ शकतील प्रकार?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा