Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कस्टर्ड ड्रॅगन (Translated Poem)

श — शुचि, Sun, 01/12/2014 - 17:48
इवल्याशा खेड्यातील इवल्याशा घरात बेलिंडा रहात असे सुखात आनंदात तिच्याकडे होता एक उंदीर, मांजर, कुत्रा लहान लाल गाड़ी अन ड्रॅगन एक भित्रा . मांजराचे नाव तिने ठेवले होते इंक कार्ड़याशा उंदराला ती हाक मारे ब्लिंक पिवळा कुत्रा वागायला होता मोठा परखड़ त्याचे नाव मस्टर्ड अन ड्रेगनचे कस्टर्ड . कस्टर्ड दिसे भयंकर फार खूंखार अंगावरती खवले त्याची नखे धारदार मुख त्याचे आग ओके नाक धूर फेके त्याला पाहताच सर्वांची उड़े फेफे फेफे . बेलिंडाच्या शौर्याला नव्हता पारावार साहसी इंक-ब्लिंकही सिंहास पळवित पार मस्टर्ड होता शूर त्याची वाघास वाटे भीती कस्टर्डच्या मागे मात्र ब्रह्मराक्षस भीतीपोटी . बेलिंडा कस्टर्डला गुदगुल्या करून छळे इंक-ब्लिंक-मस्टर्ड त्याची खोडी काढून पळे मग सगळे हसत खो-खो बसून लाल गाडीत कस्टर्ड रडवा होई, नसे समजूत कोणी काढीत . बेलिंडाचे हसून हसून पोट लागे दुखू ब्लिंकला लोळण घेता आवरत नसे हसू इंक अन मस्टर्ड त्याला टप्पल मारून पळत बिच्चार्या ड्रॅगनला सगळे मिळून छळत . असेच दिवस चालले होते आले एकदा संकट अचानक लाल गाडीवर झाली जोरात खटखट इंक म्हटली म्याऊँ जेव्हा मस्टर्ड गुरगुरला बेलिंडा हादरली समुद्री चाचा घरात शिरला. डाव्या हातात पिस्तूल, उजव्या हातात पिस्तूल दातात धरुन सुरा तो आला रागात चालून दाढ़ी त्याची काली अन एक लाकडाचा पाय विद्रूप किती त्याच्या मनात दडले होते काय? . बेलिंडाने केला मनात धावा देवाचा मस्टर्डने गुपचूप पाय काढता घेतला होता इंक मांजर घाबरून बघत बसली सोफ़्याखालॊन ब्लिंक उंदीर केव्हाचा बसला बीलात शिरून . कस्टर्ड मात्र उथला, झेप त्याने घेतली, खवलेदार मजबूत शेपूट रागाने आपटली खाँणकण आवाज झाला त्याचा आवेश होता मोठा चाचाला एका झेंपेत त्याने झोपवला . चाचा वाटले नव्हते होईल असे काही, तोंडाला बाटली लावून औषध तो पीई. गोळ्या त्याने झाडल्या केला प्रतिकार पण ताबडतोब झाला तो कस्टर्ड चा आहार . बेलिंडा ने मारली मीठी आले तिला भरुन मस्टर्डनेही आनंद व्यक्त केला शेपूट हलवून इंक ब्लिंक बाहर आले, ते होते थरथरत कसेबसे कस्टर्डला म्हटले thank You कापत . अजूनही गेलात तुम्ही त्या खेड्यात दिसेल लाल लाल गाड़ी उभी मोठ्या झोकात आजही बेलिंडा त्याला गुदगुल्या karun छळते अजून इंक-ब्लिंक-मस्टर्ड खोड़ी काढून पळते . अजूनही भित्रा कस्टर्ड रडवेला होतो अजूनही ब्लिंक हसत हसत loLaN घेतो अशी आहे गंमत आपल्या भित्र्या ड्रॅगन ची बिचार्याच्या मागे ब्रह्मराक्षस भीतीपोटी.

प्रतिक्रिया द्या
2692 वाचन

💬 प्रतिसाद (9)
श
शुचि Sun, 01/12/2014 - 21:57 नवीन
हे भाषांतर नाही आहे. रुपांतर आहे. कारण थोड़ा बदल आहे. मूळ कविता - http://www.eecs.harvard.edu/~keith/poems/Custard.html
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 01/12/2014 - 22:19 नवीन
Very very small changes are incorporated. It sounds better now - इवल्याशा खेड्यातील इवल्याशा घरात बेलिंडा रहात असे सुखात आनंदात तिच्याकडे होता एक उंदीर, मांजर, कुत्रा लहान लाल गाड़ी अन ड्रॅगन एक भित्रा . मांजराचे नाव तिने ठेवले होते इंक करड्याशा उंदराला ती हाक मारे ब्लिंक पिवळा कुत्रा वागायला होता मोठा परखड़ त्याचे नाव मस्टर्ड अन ड्रॅगनचे कस्टर्ड . कस्टर्ड दिसे भयंकर फार खूंखार अंगावरती खवले त्याची नखे धारदार मुख त्याचे आग ओके, नाक धूर फेके त्याला पाहताच सर्वांची उड़े फेफे फेफे . बेलिंडाच्या शौर्याला नव्हता पारावार साहसी इंक-ब्लिंकही सिंहास पळविती पार मस्टर्ड होता शूर त्याची वाघास वाटे भीती कस्टर्डच्या मागे मात्र ब्रह्मराक्षस भीतीपोटी . बेलिंडा कस्टर्डला गुदगुल्या करून छळे इंक-ब्लिंक-मस्टर्ड त्याची खोडी काढून पळे मग सगळे हसत खो-खो, बसून लाल गाडीत कस्टर्ड रडवा होई, नसे समजूत कोणी काढीत . बेलिंडाचे हसून हसून पोट लागे दुखू ब्लिंकला लोळण घेता आवरत नसे हसू इंक अन मस्टर्ड त्याला टप्पल मारून पळत बिच्चार्या ड्रॅगनला सगळे मिळून छळत . असेच दिवस चालले होते आले एकदा संकट अचानक लाल गाडीवर झाली जोरात खटखट इंक म्हटली म्याऊँ जेव्हा मस्टर्ड गुरगुरला बेलिंडा हादरली समुद्री चाचा घरात शिरला. डाव्या हातात पिस्तूल, उजव्या हातात पिस्तूल दातात धरुन सुरा तो आला रागात चालून दाढ़ी त्याची काळी अन एक लाकडाचा पाय विद्रूप किती ध्यान! त्याच्या मनात दडले काय? . बेलिंडाने केला मनात धावा देवाचा मस्टर्डने गुपचूप पाय काढता घेतला होता इंक मांजर घाबरून बघत बसली सोफ़्याखालून ब्लिंक उंदीर केव्हाचा बसला बीलात शिरून . कस्टर्ड मात्र उठला आता, झेप त्याने घेतली, खवलेदार मजबूत शेपूट रागानत आपटली खाँणकण आवाज झाला त्याचा आवेश होता मोठा चाचाला एका झेंपेत त्याने झोपवला . चाचाला वाटले नव्हते होईल असे काही, तोंडाला बाटली लावून औषध तो पीई. गोळ्या त्याने झाडल्या केला प्रतिकार पण ताबडतोब झाला तो कस्टर्ड चा आहार . बेलिंडा ने मारली मीठी आले तिला भरुन मस्टर्डनेही आनंद व्यक्त केला शेपूट हलवून इंक ब्लिंक बाहेर आले, ते होते थरथरत कसेबसे कस्टर्डला म्हटले thank You कापत . अजूनही गेलात तुम्ही त्या खेड्यात दिसेल लाल लाल गाड़ी उभी मोठ्या झोकात आजही बेलिंडा त्याला गुदगुल्या करुन छळते अजून इंक-ब्लिंक-मस्टर्ड खोड़ी काढून पळते . अजूनही भित्रा कस्टर्ड रडवेला होतो अजूनही ब्लिंक हसत हसत लोळण घेतो अशी आहे गंमत आपल्या भित्र्या ड्रॅगन ची बिचार्याच्या मागे ब्रह्मराक्षस भीतीपोटी.
  • Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा Sun, 01/12/2014 - 22:42 नवीन
इत्क्याने आम्ही गत्परान होणार नाही
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Mon, 01/13/2014 - 04:03 नवीन
मजेदार!!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 01/13/2014 - 04:41 नवीन
फारच मस्त आवडली
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 01/13/2014 - 08:32 नवीन
गमतीदार. :) 'कस्टर्ड' वाचून मला वाटलं पाकक्रुती टाकलीये की काय शुचिताईनी?!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/14/2014 - 06:05 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 01/21/2014 - 10:22 नवीन
मजेशीर!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/21/2014 - 15:37 नवीन
भाषांतर मस्त जमले आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा