माणुसकी आणि भावना मरत चालल्याय का ?
मागच्या आठवड्यात सौ आणि लेकीला घेऊन फिरायला जाताना आमच्या कॉलोनी च्या कॉर्नर वरतीच गर्दी दिसली, मीही मनुष्य योनितला असल्यामुळे साहजिकच थांबलो, बघतो तर काय, एका आपे रिक्श्याने एका जुन्या एस्टीम ला धडक दिली होती आणि त्या चारचाकी मधले एक दक्षिण भारतीय जोडपे त्या रिक्श्यावाल्याबरोबर तावातावाने भांडत होते. तसे पहिले तर ते जोडपे हि वयस्कर होते आणि त्यांची परिस्तिथी पण चांगली होती. तो रिक्श्यावाला पण म्हातारा होता परंतु गरीब दिसत होता. बरीच मंडळी जमली होती. ती स्त्री पोलिसात तक्रार दाखल करण्याविषयी बोलत होती तर काही लोक मिटउन घेण्यास सांगत होते. चारचाकी चे इतके काही नुकसान झाले नव्हते परंतु दरवाजा आत गेला होता. गाडी चा विमा उतरवलेला असल्यामुळे लोक मिटउन घेण्यास सांगत होते. बिचारा रिक्षावाला जरा घाबरलेला होता. कसे तरी करून शेवटी प्रकरण मिटले..रिक्षावाल्याला लोकांनी कटवले बाकी बाई ची बडबड चालूच होती .. आम्हीही निघालो तर बाजूने ३/४ तरुण जात होते, ते पण ते भांडण बघूनच जात होते नाही काही पण १६/१७ वर्षाचे असतील ते, त्यातला एक बोलत होता कि यार आता माझा मोबाइल चार्ज पाहिजे होता लगेच भांडणाचे आणि गाडीचे फोटो काढून फेसबुक आणि whatsApp वरती share केले असते. मी जरा shock झालो, मनात विचार आला कि ह्या सोशिअल मेडिया ने आजची पिढी भावना हरउन बसलीय का..लोकांना मदत करण्यापूर्वी ह्यांना त्या गोष्टीचे फोटो काढायचे असतात आणि ते share करायचे असतात. मला बर्याच वेळी असे मेसेजेस आलेत कि ती व्यक्ती मृत असते ट्रक चे चाक डोक्यावरून गेलेले असते जे बघूनच एखाद्याचा थरकाप उडेल असे हे फोटो लोक "आज झालेला अपघात" या शीर्षकाखाली share करतात. आज लोकांना दुसर्याला मदत करण्यापेक्षा त्या घटनेचे छायाचित्रण करण्यात धन्यता वाटते.
माणुसकी आणि भावना मरत चालल्याय का ?
चू. भू. माफ असावी.
प्रतिक्रिया