मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ?
खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला.. -कवीवर्य-ज्ञानेश वाकुडकरकवीवर्य ज्ञानेश वाकुडकरांच्या उपरोक्त काव्यंपंक्ती माझ्या आवडत्या काव्यपंक्ती आहेत.येथे कवीची अपेक्षा गोपनीयतेचे (प्रायव्हसी राईट्स) व्यक्तीगत राईट्स सोडण्याची नाही तर मनाच्या खुलेपणाची आहे.नवीन अथवा अपरीचित कल्पनां बद्दल माहिती घेणे आणि विचारात घेण्या करता तयार असणे म्हणजे मनाचा खुलेपणा होय. Where The Mind Is Without Fearमधील रबिंद्रनाथ टागोरांच्या "Where the world has not been broken up into fragments By narrow domestic walls मध्ये अशीच काहीशी भावना असेल का ? रबिंद्रनाथ पुढे म्हणतात Where the clear stream of reason has not lost its way Into the dreary desert sand of dead habit.जर रिझन जिंकायच असेल तर मनाचा खुलेपणा (ओपन माईंडेडनेस) लागतो खेळाडू वृत्ती नाही का ? ओपन माईंडेडनेस बद्दल John Dewey म्हणतो Openness of mind means accessibility of mind to any and every consideration that will throw light upon the situation that needs to be cleared up, and that will help determine the consequences of acting this way or that. पुढे म्हणतो to welcome points of view hitherto alien; an active desire to entertain considerations which modify existing purposes. Retention of capacity to grow is the reward of such intellectual hospitality. * अशा या मनाच्या खुलेपणाबद्दल एक मस्त युट्यूबवर सादरीकरण (इंग्रजी) उपलब्ध आहे. मिपाकरांच्या सहकार्याने मराठी विकिबुक्स प्रकल्पात मागच्या वेळी कठोर टिका कशी करावी या बद्दल चर्चा करून लेख लिहिण्याची पुर्वतयारी केली तशीच मनाचा खुलेपणा कसा जोपासावा ? या विषयावर मिपाकरांचे दृष्टीकोण माहिती करून घेऊन मराठी विकिबुक्समधील लेखात घ्यावयाचे आहेत. *वरील John Deweyच्या क्वोट्स प्रमाणेच इतरही क्वोट्स/अवतरणे मराठी विकिक्वोट्स या मराठी विकिपीडियाच्या बंधू प्रकल्पात उपलध केली आहेत. त्यांच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे. मनाच्या मोकळेपणा/खुलेपणा बद्दल मराठी/हिंदी/उर्दू लेखकांचे कवींचे अजून क्वोटेशन्स अवतरणे मिळाल्यास तेही हवे आहे. (येथील चर्चा मराठी विकिप्रकल्पात वापरावयाची असल्यामुळे आपले या धाग्यावरील चर्चेतील लेखन कॉपीराईट्फ्री होते आहे असे गृहीत धरून चालतो) *बेताचे अनुषंगिक विषयांतर चालु शकेल
प्रतिक्रिया