पाककृती
चॉकलेट चीझ केक (नो बेक )
Primary tabs
साहित्य:- २ पुडे oreo बिस्किटं किंवा कोणतेही चॉकलेट बिस्किटं,
१/४ कप बटर,
१ कप क्रीम चीझ,
१/२ कप चॉकलेट,
१/४ कप सावर क्रीम( optional),
साखर ( optional)
कृती :-बिस्किटंाचे तुकडे करून मिक्सर मधून बारीक करून घ्या.
त्या मध्ये बटर घालून नीट मिक्स करा .
एका बाउल मध्ये क्रीम चीझ फेटून घ्या ( हॅण्ड मिक्सर ने केलेले उत्तम).
दुसर्या बाउल मध्ये चॉकलेट वितळवून घ्या.
वितळलेले चॉकलेट आणि सावर क्रीम ,क्रीम चीझ मध्ये घालून एकत्र करा.
हवी असल्यास थोडी साखर घाला.
एका मोठया भांड्याला foil लावा.
त्यात आधी बिस्किटं आणि बटर चे मिश्रण घाला.
आणि वरुन क्रीम चीज़चे मिश्रण घाला.
हवे तसे सजवा. आणि फ्रीझ मधे ४-५ तासासाठी ठेवा .
मग केक बाहेर काढून भांड्याची foil काढून केक हळूच foil सह एका प्लेट
मधे काढा. आणि खायला द्या.
आहा सुंदर दिसतोय केक!!! सोप्पा पण आहे करायला!!
सोपा आहे करायला. मस्त दिसतो आहे. क्रीम चीज आणि सावर क्रीम कुठे मिळेल कल्पना नाही, बघायला हवे.
हे सावर ते गविंच्या होडन सावर मधलं सावर आहे काय ?
>>हे सावर ते गविंच्या होडन सावर मधलं सावर आहे काय ?
हो, असं तरी वाटतंय.
आवरा... भारी दिस्तय!!
मस्तच...
आवडली पा.क्रु.
झकास्स्स्स्स्स....
सोपी आणी झटपट होणारी . आवडली .
शेवट्या फोटोतला केकचा तुकडा मी फस्त केला आहे असे समजावे. :)
(केक प्रेमी} :)
कसला भारी दिसतोय केक...पाकृ आवडली...मस्त्त्त्तचं
तोंपासू :)
मस्त पाक्रु. आवडली.
छान दिसतोय केक.
मस्त!
काय फटू तरी ******!!!!!!!!
फस्तच केला बघा!!!!
मस्त दिसतो आहे केक..
स्वाती
मस्त आणि झटपट दिसतोय.
साखर ऑपश्नल का आहे? सावर क्रिम जरासं आंबटच असतं ना? क्रिम चीज मध्ये पण स्वतःची गोडी अशी नसतेचं..
नाही का?
अंड केक मध्येही न खाणार्यांसाठी एकदम छान रेसीपी.
-मयुरा.
चॉकलेट आहे ना त्यामुळे गोड होतो केक पण जास्त गोड हवा असेल तर साखर घाला.
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद! नक्की करून पहा रेसिपी खूप मस्त लागते.
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद! नक्की करून पहा रेसिपी खूप मस्त लागते.
मस्त दिसतो आहे केक.. आवडला,,
खलास्स्स्स्स्स!
कालपासुन मी हा धागा ऊघडायचे टाळत होतो पण आज रहावले नाही.
चॉकलेट आणि चीझ एकत्र! विकेट पडली ना माझी!
आता हा केक करून बघायलाच लागणार. डायटिंग गेलं तेल लावत.
फोटो आणी रेसेपी दोन्ही आवडले.
यम्मीईईईईईईईईईईईईइ ते क्रीम चीज आणि सावर क्रीम कुठे मिळतं ? स्वीट होम मध्ये मिळेल का? तिथे दुधाचे बरेच पदार्थ मिळतात.
भारीच... सहज आणि सोप्पी पाककृती :)
सही दिसतोय केक
नो बेक.. सहिये... घरी दाखवायला हवा..
कॅलरी वाढवणारी पाकृ.
पण इथे फिकीर आहे कुणाला? आणा ती बशी इकडे. ;)
मस्त!
सुंदरच!
आजच माझ्या मुलीच्या वाढदिवसा निमित्ताने असचे कॅके आणला होता तो पण मैत्रिणीने घरीच केला होता अर्थात तिने मुंबईतील प्रभादेवी येथील कॅटरिंग महाविद्यालाय्तून ६ महिन्याचाcourseपूर्ण केला आत्ता ती अतिशय चांगले कॅके करते कोणाला कोणतेही पदार्थ करण्याची आवड असेल तर professional short term course करता येतात वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहिती हवी असल्यास देता येईल धन्यवाद
कॅके कायको?
केक ल्हिवा की काकू :P
धन्यवाद!!! हो इकडे अमेरिका मध्ये ही बरेच course आहेत. पण हे सारे बस आवड म्हणून .