Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पारा

D — drsunilahirrao, Fri, 01/17/2014 - 13:05
...पारा तुझ्या पावलांची इथे खुण अजुनी पडे पावलांना तुझी भुल अजुनी नभी कल्पनेच्या उन्हाचा धुराळा तुझ्या सावलीला उरे प्राण थोडा दिशांच्या उरी वादळाची कहाणी उरे जन्म आता दिव्याच्या ठिकाणी फुटे प्राण उल्केसम वेदनेला फुलांच्या उरी दाटतो घाव ऒला तुझा शब्द प्राणातुनी साद देतो जुन्या मैफिलीची जुनी य़ाद देतो तुझे ऒठ हळव्या मदाच्या मशाली रुधीरातुनी वाहते तप्त लाली उङो सप्तरंगी निशेचा धुराळा असा चंद्र श्वासातुनी माळ थोडा तुझे गात्र॑ गात्र लपेटून घेतो तुझे भास श्वासात माळून घेतो मिठीने सरावा युगांचा दुरावा इथे ज्न्म अवघा फुलांचा उरावा फिरे कालचक्रावरी उष्ण पारा .. उरे फक्त थोडा मिठीचा किनारा डॉ.सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
1782 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मेघवेडा Fri, 01/17/2014 - 14:49 नवीन
व्वा! ज्जे ब्बात! लै म्हणजे लै आवडली! काही काही पदं खासच जमली आहेत! जियो बॉस! दिल खुश हो गया.
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Fri, 01/17/2014 - 16:19 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
P
psajid Sat, 01/18/2014 - 06:55 नवीन
आशय घन कविता ! काफिया रदीफ यांना विचारात घेऊन मीटरमध्ये बसवली असती तर एक छान गझल बनली असती असे वाटते.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 01/21/2014 - 17:20 नवीन
मस्त कविता!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 01/23/2014 - 16:50 नवीन
सुरेख !
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Fri, 01/24/2014 - 06:25 नवीन
आवडली.
मिठीने सरावा युगांचा दुरावा इथे ज्न्म अवघा फुलांचा उरावा
हे खासच!
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Sun, 02/02/2014 - 14:47 नवीन
@मेघवेडा, इन्दुसुता, पैसा ,ज्योति कामत, मदनबाण ,अनुप ढेरे, psajid , धन्यवाद
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा