Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक कप चहा...!

J — jaypal, Fri, 01/17/2014 - 18:48
एक कप चहा..! अगदी मनापासून सांगतो चहाच्या "या" कपाने मी नेहमी भारावतो. परत परत हरवतो. कितीदा तरी पिऊन "हा " चहाचा घोट मला पुन्हा पुन्हा वेडावतो. आज बाहेर पाऊस तुफान "पेटलाय", अगदी माझ्यासारखा..! रागरंग बघून लवकर "विझेल" असं वाटत नाही...जुनीच सवय दोघांची.! भर दुपारीच दाटलाय मिट्ट काळोख डोळ्यांसमोर.! मी उभा असतो बाल्कनीमध्ये, भिंतीवर अंग रेलून...ध्यानमग्न योग्याप्रमाणे "त्याच्यावर" त्राटक जमवून.! मधेच चमकते लख्ख सय तुझी, एखादी वीज बनून माझ्या चेह-यावर.! आवेगाचे तुषार बघ हा कसा उडवतो उनाड वारा, अन् "फुलवतोय" काटा देहावर एक एक फटकारा..! एक, दोन, तीन....अगणित अगणित फटक्यांची शिक्षा. सरसरून शिरशिरी! नाही.! कोणतीही गझल किंवा शास्त्रीय राग ऐकायचा नाही मला. फारच फिल्मी वाटतं मग आयुष्य ...एखाद्या आर्टफिल्म सारखं.! आहे तसंच वाहू द्यायचंय "ते" ..."त्याच्या" सारखं.! तार सप्तक आता टिपेला पोहचलंय ”त्याचं", माझ्या इतकंच.! थैमान!! नुसतं थैमान घातलंय "त्यांनी". ऐकायलाच तयार नाहीत... बेबंद पाट पाण्याचे.... बाहेर आणि आतसुद्धा... त्याला "कोसळताना" बघता बघता जाणवलं.. अरे! इथे ओल आहे बाल्कनीच्या दगडी भिंतीस.. तिनेच...होय त्या भिंतीनेच आजवर रोखून धरलय मला.! नाही तर कधीचाच वाहवत गेलो असतो "तुझ्या" प्रवाहात.! भानावर येतो कधी तरी, तिच्या आवाजाने "अहो ऐकलं का? चहा गार झालाय ...दुस-यांदा" - जयपाल

प्रतिक्रिया द्या
2588 वाचन

💬 प्रतिसाद (10)
क
किसन शिंदे Sat, 01/18/2014 - 05:08 नवीन
अतिशय सुरेख लिहीलंयस रे जेपी. :)
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sat, 01/18/2014 - 05:34 नवीन
मुक्तक अस्वस्थ करून गेले... काही काही दिवसच असे असतात...
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 01/18/2014 - 06:18 नवीन
जिंदगी तेरे नाम पे आज ये क्या आया हर शख्स को मैने खुदसेही परेशान पाया
  • Log in or register to post comments
P
psajid Sat, 01/18/2014 - 06:52 नवीन
हं.... ! गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....!
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sat, 01/18/2014 - 06:54 नवीन
मुक्तक आवडलं.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 01/18/2014 - 09:33 नवीन
अस्वस्थ करण्याइतपत!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 01/21/2014 - 17:30 नवीन
वाह आणि आह... दोन्ही एकदमच ओठावर आले!
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Wed, 01/22/2014 - 04:14 नवीन
यप्प... हेच बोलतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
J
jaypal Wed, 01/22/2014 - 12:28 नवीन
किसन उल्लेख करण्याचे विसरलो होतो. क्षमस्व. किसन खुप खुप आभार सर्व वाचकांचे आणि प्रतीसादकांचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/23/2014 - 10:00 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा