काकस्पर्ष
आज एक सिनेमा पाहिला इन्विजिबल या नावाचा. आत्मा मरणासन्न अवस्थेतलं शरीर शोधतो अशी साधारण कथा असलेला चित्रपट. आयएमडीबीवर रीव्हिव्यू वाचताना ट्रिवियामध्ये एक गोष्ट वाचली.
"The shirt that Nick is wearing at the end of the movie bears a crow on the chest. In some Native American legends (and the graphic novel by James O'Barr bearing the name) the crow could carry a person's soul back from the land of the dead."
(http://www.imdb.com/title/tt0435670/trivia?ref_=tt_trv_trv)
मला वाटायचं पिंडाला कावळा शिवणे, काकस्पर्ष वगैरे भोंदूगिरी आपल्यातच आहे. पण ही भोंदूगिरी युरोपातदेखिल आहे हे वाचून सखेद आश्चर्य जाहले. जगातला सगळ्यात टाकाऊ, निरर्थक गोष्टींनी भरलेला, मागासलेला आपला समाज आहे असं वाटायचं. बुध्दीप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ वगैरे लोकांची तशी ठाम समजूत असते.
तसाच http://perspectiveszine.webnode.sk/news/ravens-and-crows-in-mythology-folklore-and-religion/ या इथे आणखी थोडे वाचायला मिळाले. इंग्रजी थोडी कच्ची असल्याने सगळे काही समजले नाही.
आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे "कावळा" हा समान धागा आहे. इतर कुठलाही पक्षी किंवा प्राणी नाही, कावळाच. हे कावळ्याचं दोनहीकडे समान असणं काही लक्षात नाही आलं. कुणी जाणकार यावर प्रकाश टाकतील का?
प्रतिक्रिया