Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संक्रांति ऋतू परिवर्तन

व — विवेकपटाईत, Sat, 01/18/2014 - 07:18
दिनांक: १८.१.२०१४. संक्रांति दरवर्षी जनवरीच्या १४ किंवा १५ तारखेला येते. त्या पूर्वी दिल्लीच्या कुडकुडत्या हिवाळ्यात माणूस काय लेखणी ही जमून जाते. जवळपास महिन्याभरा पासून बिछ्यान्यात दडून बसलो होतो.संक्रांति पासून मोठा होणारा दिवस जाणवू लागतो. सकाळी थंड वर आणि दुपारी सूर्याच्या उन्हात थोडी उष्णता जाणवते. पर्वतांवर बर्फ वितळू लागते. उत्तरेकडून येणारे वारे सुरु होतात ते शिवरात्री पर्यंत ४० दिवस राहतात याला ‘चिल्ला जाडा’असे म्हणतात. धुक्याचा परदा दूर होतो. शेतांत सरसोंला(मोहरी) फुले येतात. दूरपर्यंत पिवळा गालीचा पसरलेला सहज दिसतो. जुनी पाने गळून पडतात, झाडांना नवे कोंब फुटतात जणू धरती वसंताच्या स्वागतास सज्ज होते आहे. जवळपास महिन्याभरा पासून बिछ्यान्यात दडून बसलो होता. ढगाळ वातावरण असल्यामुळे बाहेर थंडी आहे, तरी ही एक उत्साह मनात निर्माण झाला. आज सकाळी लवकर अंघोळ केली आणि सकाळी मनात आलेले विचार (क्षणिका) टंकित करू लागलो. (१) रात्रीची विराणी धुक्यात विरली प्रेमाची गाणी ओठांवर आली. (२) धुक्यातुनी डोकावली गुलाबाची कळी प्रेमाची लाली गालावर पसरली. (३) हळद लाउनी धरती नटली लेक लाडकी निघाली सासरी.

प्रतिक्रिया द्या
1162 वाचन

💬 प्रतिसाद (2)
A
Atul Thakur Sat, 01/18/2014 - 16:20 नवीन
वा पटाईतसाहेब !!! मस्तच.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 01/19/2014 - 06:01 नवीन
व्वा. दिल्लीची थंडी मस्तच असते. भरपूर उत्साह वाटतो, आणि खाण्यापिण्याची चंगळ. क्षणिका छान आहेत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा