Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कॉफीचं कॅथार्सिस अर्थात चिडचिड-ए-सोमवार

आ — आदूबाळ, Mon, 01/20/2014 - 15:49
अरबट कॉफी चरबट कॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी || डोक्याची ग्रेव्ही, इनबॉक्सचं मटण | कॅफेनची किक, बुळबुळीत बटण | पहिला ढकलतोय, चारच बाकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||१|| परीट घडी, टायचा बावटा | आकड्यांची उसळ, एक्सेल पावटा | बॉस निकम्मा, टीम पापी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||२|| पायांची घडी, मांडीवर पोट | अप्रेझल मीटिंग, बोका भोट | परफॉर्मन्स मदिरा, रेटिंग साकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||३|| गारगिट्ट पोळ्या, बकाबकाबका | सिग्रेटचा धूर, फकाफकाफका | पगार, पीएफ, बोनस टॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||४||

प्रतिक्रिया द्या
8019 वाचन

💬 प्रतिसाद (29)
प
प्रचेतस Mon, 01/20/2014 - 15:56 नवीन
जबरा. अशोककुमारांची 'रेलगाडी' आठवली.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 01/22/2014 - 17:58 नवीन
आणि मर्ढेकारी थाट्सुद्धा ! बाकी, इतकी वर्षे कॉफी पितेय पण कधी अरबट चरबट किंवा करपट नाही बॉ लागली. अरभाटच लागली प्रत्येक वेळी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
आ
आदूबाळ Wed, 01/22/2014 - 18:19 नवीन
तुमचं नशीब थोर - मशीनजन्य कॉफी प्यावी लागत नसावी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/20/2014 - 15:57 नवीन
आवडेश. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चैत्रबन Mon, 01/20/2014 - 16:03 नवीन
लैच भारी :)
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 01/20/2014 - 16:04 नवीन
कविता आवडली . पण कुणतरी वहीपेन घेऊन या .
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 01/20/2014 - 16:29 नवीन
आवडलं!!
  • Log in or register to post comments
त
तिमा Mon, 01/20/2014 - 16:30 नवीन
छान कविता लिहिली आहे, मर्ढेकरी बाज वाटला.
  • Log in or register to post comments
ह
ह भ प Mon, 01/20/2014 - 16:38 नवीन
नकळत मोठ्या आवाजात चाल लावत बसलो..
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Mon, 01/20/2014 - 17:34 नवीन
मस्त, चिडचिड पोहोचली. - (फिल्टर कॉफी पिणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 01/20/2014 - 18:24 नवीन
भयानक्,हास्य, करूण सगळे रस अगदी नीट उतरलेत!
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Mon, 01/20/2014 - 19:07 नवीन
होई सायंकाळ, ऑफिस खलास| रिचवा रेडवाईन, हातात ग्लास|| रंगबेरंगी ढग, हवेत गारवा| फ्रेश होऊन आता, ऐका मारवा|| डोक्यावरून फिरेल मायेचा हात| वाईट परिस्थिती वर कराल मात|| सुख दु:ख हे असेच येईल अन जाईल| जन्म जन्मांतर हे नाते टिकून राहील|| आपला मिपास्नेही :आयुर्हीत
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 01/20/2014 - 20:05 नवीन
सोल्लिड. :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 01/20/2014 - 21:27 नवीन
तुफ्फा....न!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 01/21/2014 - 02:37 नवीन
बॉस निकम्मा, टीम पापी | अप्रेझल मीटिंग, बोका भोट |
अगदी, अगदी! :D
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Tue, 01/21/2014 - 03:11 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 01/21/2014 - 15:58 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार! कमीत कमी ओळींत जास्तीत जास्त चिडचिड ठासण्याच्या नादात थोडी दुर्बोध झाली - तथास्तु यांची सूचना रास्त आहे!
  • Log in or register to post comments
ज
जॅक डनियल्स Tue, 01/21/2014 - 16:03 नवीन
लैच भारी झाले आहे. हे लिहीताना पण हातात "अरबट कॉफी चरबट कॉफी" चाच कप आहे. क्याफिन धोसल्या शिवाय डोक्याची चक्रे फिरतच नाहीत.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 01/21/2014 - 16:15 नवीन
मंडे सीकनेस मस्त पकडलाय. बरे झाले सोमवारी सकाळी कविता वाचली नाही...डोक्याची मंडई झाली अस्ती. (कृ. ह. घ्या) अवांतर-- कोणत्यातरी ऐटी कंपनीत काम करता काय?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 01/21/2014 - 16:18 नवीन
कोणत्यातरी ऐटी कंपनीत काम करता काय?
येवढी कुठली आमची ऐट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
च
चाणक्य Tue, 01/21/2014 - 18:36 नवीन
झकास झालीये. टोटल भा.पो.
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 01/22/2014 - 04:16 नवीन
ना लांबड ना क्रमशः ची जिल्बी सगळ एका झटक्यात (थेट)... "तुमचं आमच सेम असते" अ‍ॅप्रेझल दिंडीतला "वारकरी"
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 01/22/2014 - 04:21 नवीन
मस्त. (तो मायेचा हात कुणाचा, तेवढं सांगा).
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Wed, 01/22/2014 - 05:43 नवीन
अर्थात आपल्याला समजून घेणाऱ्या प्रिय व्यक्तीचाच !(ती प्रिय व्यक्ती कोण हे प्रत्येकाने आपल्या categery प्रमाणे ठरवावे!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
स
सुहास झेले Wed, 01/22/2014 - 04:22 नवीन
सहीच... !!
  • Log in or register to post comments
व
विटेकर Wed, 01/22/2014 - 06:11 नवीन
आवडली.. मर्ढेकरांचे उंदीर "पिपात मेले" आणि आपले "कपात मरताहेत" .. हाच काय तो फरक ! आयुष्य " आयटी" असले तरीही "बेकेलायटी" आहे हेच जास्त खरे आहे ! उत्तम !
  • Log in or register to post comments
म
म्हैस Wed, 01/22/2014 - 07:35 नवीन
लय भारी.
बॉस निकम्मा, टीम पापी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||२||
हे जास्त
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 01/22/2014 - 08:02 नवीन
मर्ढेकरी बाज पर्फेक्ट पकडलाय. बॉस निकम्मा टीम पापी वाली ओळ सर्वांत जास्त आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 01/22/2014 - 14:17 नवीन
आवडली. टाय सूट काढा नि जीन्स शर्ट हेल्मेट घाला. नॉन ऐटी असूनही सहमत. - 'आप बहुत ज़्यादा होपलेस काम कर रहे हो' चं पालुपद सगळ्यांना ऐकवणार्‍या बुडबत पांडेचा सबार्निडेट
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा