Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

समुद्र......!!

फ — फिझा, Tue, 01/21/2014 - 05:45
समुद्र......!! किनाऱ्यावर भेटतात सगळे जरी … तुझा एकटेपणा कुणा दिसला का कधी आकाशाचा रंग लेऊन घेतोस तुझा रंग कधी पहिला का कुणी हसतोस फक्त लाटांमध्ये ..... तू रडतोस खोल आत कुठेतरी ………. ! रोज तसाच दिसतोस तू ,… अथांग… प्रत्येक एकट्याला अरे , तुझाच संग …. तुझ्या लाटांबरोबर ओठावरचे हसू … तुझ्या क्षितीजाबरोबर डोळ्यातले आसू …. पायाखालून निसटलेल्या रेतीचा आधार शेवटी … हसतोस फक्त लाटांमध्ये …तू , रडतोस खोल आत कुठेतरी ………. रोज नव्याने जगतोस तू ,… एकटा सूर्याचा दाह झेलतो तू असा .... जणू चंद्राच्या चांदण्यांचा सडा , तुझ्या मिलनाला …सगळेच पारखे…... तूझ्या किनाऱ्यावरले घरकुलही पोरके .... म्हणूनच का ....... हसतोस फक्त लाटांमध्ये …तू , रडतोस खोल आत कुठेतरी ………. खळाळणारा तू… पण किती अबोल तुझी भाषा , वेड्यावाकड्या पाण्यातही दाखवतोस सरळ रेषा … देतोस हिम्मत कधी, तर कधी धैर्य… पाहून कुणाचा उसासा … कधी साथ कुणा तुझी … तर कधी दिलासा … अरे ! मरणालाही तू देतोस जगण्याची आशा …। तुझं सगळं तुझ्यापाशी , आमचंही सग्गळं तुझ्यापाशी कारण …… हसतोस फक्त लाटांमध्ये …तू , रडतोस खोल आत कुठेतरी ………. -----फिझा.

प्रतिक्रिया द्या
3085 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 01/21/2014 - 06:29 नवीन
छान झालीये रचना. आवडली.
  • Log in or register to post comments
म
म्हैस Tue, 01/21/2014 - 06:54 नवीन
का बरं रडतो हा समुद्र ???
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 01/21/2014 - 10:29 नवीन
उत्तम भाव. खूप आवडले.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 01/21/2014 - 10:31 नवीन
व्याकरणाच्या काही किरकोळ चुका खटकल्या. जसे की
सूर्याचा दाह झेलतो तू असा
इथे झेलतोस असयला हवं. बाकी उत्तमच.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 01/21/2014 - 12:35 नवीन
सेंटीमिटर काव्य!
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Tue, 01/21/2014 - 15:48 नवीन
तुझा एकटेपणा कुणा दिसला का कधी? कवयीत्री एक जबरदस्त "मनकवडा" असल्याची जाणीव करून देतात या ओळी! मनापासून आवडले हो! देतोस हिम्मत कधी, तर कधी धैर्य… पाहून कुणाचा उसासा … कधी साथ कुणा तुझी … तर कधी दिलासा … अरे ! मरणालाही तू देतोस जगण्याची आशा …। सर्वांनी याची नोंद घ्यावी असे एक आदर्श उदाहरण दिलेले आहे. कवितेचा नायक अबोल असला तरी त्याच्या मनातल्या सर्व भावना स्पष्ट करणारी एकंदरीत खूप छान कविता आहे ही. आपला मिपास्नेही: आयुर्हीत
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 01/21/2014 - 15:54 नवीन
सुंदर !!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा