कोंग्रेस चे राजकारण आणि रामदेवबाबा, अण्णा, केजरीवाल वगैरे...
(मी एक कोन्स्पिरसी थिअरी मांडत आहे. सर्वांनी सहमत व्हावेच असे नाही.)
सध्या आम आदमी पार्टीने सर्वच मीडिया हायजॅक केला आहे.
सोमनाथ भारती प्रकरणात देखील दोन्ही प्रकारच्या बाजू समोर येतच आहेत. मला सध्या वेगळा प्रश्न पडला आहे.
तो प्रश्न आहे आम आदमी पक्ष काँग्रेस चे अपत्य आहे का?
याला अनुमोदन देणारी माझी निरीक्षणे -
२०१० पासून जेव्हा काँग्रेस च्या भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे बाहेर पडू लागली तेव्हापासूनच कॉम्ग्रेस अस्वस्थ होती. लोकांच्या मनात प्रस्थापितांबद्दर तीव्र राग आहे हे दिसतच होते. तेव्हा हा राग असाच धुमसत राहिला तर कॉंग्रेसचे पानिपत व्हावयास वेळ लागणार नाही हे कॉंग्रेसमधील महारथी नक्कीच जाणून असावेत. त्याच भावनेतून त्यांनी ३ प्रयत्न केले असे माझे मत आहे.
१. २००८-९ पासून रामदेवबाबांच्या मागे बरीच जनता होती, त्यांना अधिक बळ देऊन लोकांचे लक्ष त्यांच्या विधायक भारत स्वभिमानकडे वळवणे. रामदेवबाबांच्या मागे काँग्रेसचे बरेच पुढारी होते, हे सर्वांनाच माहीत आहे. - पण ही खेळी चुकली, पुरेशी ताकद मिळाल्यावर रामदेवबाबा उन्मत्त (? योग्य शब्द सुचवा) झाले आणि कॉंग्रेसच्या विरोधात उभे राहिले. २०११ मध्ये त्यांनी २ जून च्या रामलीलाच्या आंदोलनाची घोषणा केली. या घोषणेने कॉंग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली.
रामदेवबाबा कोंग्रेस सोबत नाहीत हे स्पष्टच झाले होते, आणि ते निवडणूक लढवण्याची भाषा देखील करत होते. त्यावेळी हे सर्व विरोधक एकत्र होते. अण्णा हजारे, केजरीवाल किरण बेदी, राजू दिक्षीत वगैरे सर्व भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात उभे राहणार असे चित्र होते. त्यांच्यात फूट पाडायला कोंग्रेस ने दुसरी खेळी खेळली. आतापर्यंत एकत्र काम करण्याची भाषा करण्यार्यांपैकी केवळ रामदेवबाबांनाच राष्त्रीय स्तरावर प्रसिद्धी होते. त्यामुळे याच कार्यकर्त्यांमधील अण्णा, केजरीवाल आणि बेदी यांना घेऊन एक नवे आंदोलन उभारण्यात आले. महत्वाची गोष्ट अशी आहे, की रामदेवबाबांचे २ जून चे उपोषण ५-६ महिने अगोदर घोषित करण्यात आले होते. आणि रामदेवबाबा त्या शक्तिप्रदर्शनासाठी भारतभर सभा/ शिबिरे घेत होते. २ जून च्या आंदोलनाच्या वेळी रामदेवबाबा नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार अशी पण बातमी होती.
परंतु अचानक अण्णा, आणि केजरीवाल यांनी वेगळीच खेळी केली. त्यांनी एप्रिलमधेच उपोषण सुरु केले. सरळ आहे की हा प्रयत्न रामदेवबाबांच्या शिडातील हवा काढण्याचा पहिला प्रयत्न होता. तो सफल झाला आणि अण्णांच्या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. रामदेवबाबा काहीसे बॅकफूटवर ढकलले गेले.
ही खेळी सफल झाल्यावर पुढची खेळी खेळली गेली - ती म्हणजे रामदेवबाबांचे आंदोलन चिरडण्याची. त्यात काय झाले ते मी सांगण्याची गरज नाही. रामदेवबाबांचा कच्चा गृहपाठ या निमित्ताने समोर आला, आणि त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा पुढे ढकलली. त्यात कोंग्रेस ने नसत्या चौकश्या/ भानगडी मागे लावून त्यांना थोडे आणखीन मागे ढकलले. खरी गम्मत तर त्यापुढेच झाली.
रामदेवबाबांच्या चिरडल्या गेलेल्या आंदोलनाचा खरा फायदा झाला तो १५ ऑगस्ट्च्या आंदोलनाला. त्यावेळी मिळालेल्या
प्रतिसादामागे ४जून च्या रागाचा मोठा वाटा होता. अर्थात एव्हाना रामदेवबाबा कोपर्यात पडले होते, आणि सारी सूत्रे अण्णा आणि पर्यायाने केजरीवालांच्या पारड्यात पडली होती.
आता रामदेवबाबांचे खच्चीकरण सरकारने का केले असा प्रश्न पडू शकतो, याची माझ्या मते मुख्य कारणे अशी आहेत
१. रामदेवबाबांच्या मागे धर्मनिरपेक्ष (मिथ्या धर्मनिरपेक्ष नव्हे) लोक देखील बरेच ताकद होती त्यामुळे ते मुस्लिम सोडल्यास ग्रामिण भागात काँग्रेस ची मते खाण्याची बरीच शक्यता होती.
२. रामदेवबाबांचे अनुयायी अराजकीय, तसेच राजकीय देखील होते, त्यामुळे त्यांनी देशव्यापी निवडणूका लढवायची घोषणा केली असती, तर कदाचित त्यांच्या बलवान संघटनामुळे ते कदाचित किंगमेकरच्या भूमिकेत देखील येउ शकले असते, आणि तसे झाल्यास त्यांनी तटस्थ राहण्यापेक्षा भाजपच्या पारड्यात माप टाकले असते.
यामुळे रामदेवबाबांबी निवडणूकाच्या राजकारणात पडणे हे काँग्रेस साठी धोक्याचे घंटा होते.
असो.
रामदेवबाबांचे खच्चीकरण झाले, पण मुख्य प्रश्न सुटला नाही. रामदेवबाबा स्वतः निवडणूक लढवणार नाही, पण स्वछ उमेदवाराचा प्रचार करू असे सांगू लागले. म्हणजे आली का पंचाईत! कारण आता ते सरळ भाजप च्या वळचणीला जऊन बसणार हे स्पष्ट होते. त्यामुळे ही विरोधी मते फोडण्यासाठी निवडणूक लढवणारा पर्याय स्थापन करणे आवश्यक झाले. अण्णा तर निवडणूकीच्या राजकारणात उतरणार नव्हते, आणि १५ ऑगस्ट नंतर अण्णांच्या लोकप्रियतेला पण ओहोटी लागू लागली. मुंबईतील आंदोलनात याचा प्रत्यय आला. म्हणून मग पुढच्या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्लीत करण्याचे ठरले.
केजरीवालांची राजकीय महत्वाकांक्षा लक्षात घेऊन त्यांना निवडणूकीचे आव्हान दिले गेले. अपेक्षेप्रमाणे त्यांनी ते स्वीकारले आणि दिल्लीच्या विधानसभेत विरोधकांची बहुतांश मते खाऊन ते निवडून आहे. दुर्दैवाने केजरीवालांच्या डोक्यात ते यश गेल्याने ते लोकसभा लढवण्याची भाषा करत आहेत, आणि दिल्लीत जे झाले त्याची पुनरावृत्ती देशभर होईल असे दिसत आहे.
मला पडलेले प्रश्न असे
१. २०१४ ला प्राप्त परिस्थितीत आप पर्याय म्हणून आला, तर आपण आप ला मत द्याल क?
२. केजरीवाल हे सर्व समजून उमजून करत आहेत, किंवा अज्ञानामुळे याला बळी पडत आहेत किंवा कसे? कारण त्यांनी लोकसभा लढवल्यामुळे मतविभागणी होणार हे तर स्पष्ट आहेच.
३. केजरीवाल लोकसभेत कॉंग्रेस च्या परंपरागत (व्होट बँक) मतांपैकी किती मते खातील, आणि अॅण्टी इन्कम्बसी पैकी किती मते खातील?
४. केजरीवालांचा उदय भाजपाला काही प्रमाणात पथ्यावर पडेल का? उद. मुस्लीम मते खाणे वगैरे. आणि एकंदरीत २०१४ मध्ये स्थिती काय असेल?
प्रतिक्रिया