Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"परिस्थिती"

अ — अमेय६३७७, Sat, 01/25/2014 - 06:07
(सुनीत: वनहरिणी मात्रावृत्त) बर्फावरती झुंजूमुंजू थंड शांतता करे पहारा  शेकोटीची ऊब सोडता श्वास गोठतो, फुले शहारा  दूर कुठेसे शहर जागते आखडलेले पाय मोकळे पुन्हा एकदा सळसळती जे काल श्रमाने गाढ झोपले  बर्फावरच्या 'ह्याच्या' हाती बंदुक चमचमणारी काळी तंबूमधली झोप क्षणाची अंधुक सीमा घाली हाळी  शहराकाठी 'त्याची' जागा गाडी गाठायाची घाई  वेळ साधणे सूत्र दिनाचे वेगासंगे वाहत जाई  काही तत्त्वे थोड्या निष्ठा एकाचे जगण्याचे इंधन  कर्तव्याचे पाश टाकती दुसऱ्याच्या असण्याला बंधन  काय माहिती कुठली गोळी करील अवचित सावज 'याचे' तसेच 'त्याचे' जगणेसुद्धा ताणामधल्या सुप्त भयाचे  इथला हा अन् तिथला तोही, दोघे सैनिक एका अर्थी  परिस्थितीशी दोघे लढती, आयुष्याच्या सोसुन शर्ती ! -- अमेय

प्रतिक्रिया द्या
2409 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 01/25/2014 - 06:28 नवीन
वा..वा..वा..! __/\__ काय बोलू? केवळ अप्रतीम!
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sat, 01/25/2014 - 10:39 नवीन
क्या बात! अनेक वर्षांपूर्वी साप्ताहिक सकाळ दिवाळी अंकात आलेली अनंत सामंतांची याच थीमवरची कथा आठवली...
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 01/25/2014 - 10:43 नवीन
काव्यलेखन असंच चालू ठेव!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 01/25/2014 - 10:50 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sat, 01/25/2014 - 13:09 नवीन
उत्कृष्ट रचना. फार भावली.
  • Log in or register to post comments
च
चैत्रबन Sat, 01/25/2014 - 20:12 नवीन
एकदम आवडेश..
  • Log in or register to post comments
स
सुधीर Tue, 01/28/2014 - 14:27 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 01/28/2014 - 16:07 नवीन
मस्तच!!
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Tue, 01/28/2014 - 16:38 नवीन
कविता जरी छान असली तरी मला असे वाटते की सीमेवर उन्हात/थंडीत/पावसात/गोळीबारात उभे राहून देशाचे रक्षण करणे हे नक्कीच एक महान कार्य आहे, ज्याची सय आम्हा civilians ना कधी येणार नाही. स्वत: मी तरी या आपल्या जवानांना सलाम करतो. जय हिंद! जय हिंद कि सेना !! कालच "ए मेरे वतन के लोगो" या भावपूर्ण गीताला ५० वर्षे पूर्ण झालेत. ह्या गीतातही "परिस्थिती" चे चांगल्या पद्धतीने वर्णन आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चिन्मय खंडागळे Tue, 01/28/2014 - 17:34 नवीन
सहमत आहे. सियाचेनवर थंडीवार्‍यात शब्दशः 'मरायला' उभा असलेला सैनिक आणि ढेरी सावरत ब्रीफकेस आणि डबा घेऊन गाडी पकडायला धावणारा चाकरमानी यांची तुलना जरा अन्यायकारक वाटते. कविता म्हणून ठीक :)
  • Log in or register to post comments
अ
अमेय६३७७ Tue, 01/28/2014 - 18:37 नवीन
खरेच आहे, सैनिक आणि असैनिक यांत पूर्णपणे साम्य आहे असे सांगणे असा या कवितेचा उद्देश नाही तर आपापल्या जागी सचोटीने काम करताना दोघांच्याही जीवनात 'परिस्थितीशी लढणे' कसे अविर्भाज्य असते या साम्यावर भाष्य इतकेच मांडायचे आहे.
  • Log in or register to post comments
ज
जोशी 'ले' Tue, 01/28/2014 - 19:13 नवीन
व्वा..सुंदर रचना
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 01/28/2014 - 20:50 नवीन
सुंदर कविता. आवडली. ह्यात शारीरिक मृत्यूची तुलना नसून दोन वेगळ्या भयकारी परिस्थितीत मानसिक दडपणाची तुलना आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा