Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रसिका

अ — अज्ञातकुल, Tue, 01/28/2014 - 06:29
गुंतती खुणा गाठती रेशमी धागे हृदयात रुधिर रसिकाचे जेंव्हा जागे चांदणे टिपुर आवसेचे निर्मळ अवघे चंद्रास न माहित पण; ते पडद्यामागे श्वासांचे प्राक्तन; सुखवी प्रेम नि माया चिरतरुण ठेवते अभिलाषा; मन-काया जन्मास सोबती गोत; खेळ खेळाया शोधण्या किनारा लाट हवी उसवाया प्रेरणा कामना उचंबळाचे कारण ऋतु गंध रंग रस चैतन्याचे सारण अभिसरण नसे ते; रुक्ष पोरके अंगण दशदिशा चराचर अस्वादास्तव आंदण ………………… अज्ञात

प्रतिक्रिया द्या
1749 वाचन

💬 प्रतिसाद (4)
आ
आयुर्हित गुरुवार, 01/30/2014 - 08:19 नवीन
"श्वासांचे प्राक्तन; सुखवी प्रेम नि माया चिरतरुण ठेवते अभिलाषा; मन-काया" व्वा, क्या बात है! जबरदस्त विचार ! कवितेत किती सहजपणे सुखी जीवनाचा व दीर्घायुषाचा मूळमंत्र सांगितला आहे. धनयवाद एक शंका: चंद्राच्या प्रकाशाला चांदणे म्हणतात कि चांदण्यांच्या प्रकाशाला?
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Fri, 01/31/2014 - 06:21 नवीन
चन्द्राची "आभा" चांदण्यांचा प्रकाश म्हणजे "चांदणे". "चंद्राचे चांदणे" म्हणजे "चंद्राच्या सख्या चांदण्या". आमावसेला चंद्राची आभा नसते म्हणून चंदणे "टिपूर" दिसते. हे माझे निरीक्षण आणि त्यावरून तयार झालेले मत. :) प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
म
मदनबाण Fri, 01/31/2014 - 01:48 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 01/31/2014 - 07:16 नवीन
झक्कास!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा