Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चांदणचकवा

प — पद्मश्री चित्रे, Sat, 02/01/2014 - 15:34
काट्यांत हरवली वाट संदिग्ध पावले माझी वळणावर एका अवचित अबोल होऊनी गेली.... वस्ती ही आता दूर वळ्ण्याचा नाही धीर एकाकी निर्जन रानी हे श्वास ही होती तीर.... जगण्याचे वादळ शमले मृत्युची ओढ न उरली निस्तब्ध शांत या रात्री ओझेच सावली होई.... भिरभिरतो रानी आता दिशाहीन जणू रावा जगण्याच्या आवर्ताला मरणाचा चांदणचकवा... पद्मश्री चित्रे (फुलवा)

प्रतिक्रिया द्या
4035 वाचन

💬 प्रतिसाद (20)
इ
इन्दुसुता Sat, 02/01/2014 - 17:09 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 02/01/2014 - 17:30 नवीन
कविता आवडली. एकदोन जागी यमक जुळवता आलं असतं. ते राहिलं आहे. वळणावर एका अवचित अबोल होऊनी गेली.... इथे काहीतरी वेगळा शब्द हवा होता असं वाटलं. तसंच निस्तब्ध शांत या रात्री ओझेच सावली होई.... याऐवजी ओझेच सावली झाली.. असं जास्त चांगलं वाटलं असतं का?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 02/01/2014 - 17:34 नवीन
ओझेच सावली झाली हे व्याकरणदृष्ट्या योग्य वाटत नाही. चूभू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 02/01/2014 - 18:07 नवीन
ओझ्याची सावली झाली का सावलीचे ओझे झाले यावर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Sat, 02/01/2014 - 18:30 नवीन
बरोबर. पद्मश्रीच सांगू शकेल तिला काय म्हणायचंय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
य
यशोधरा Sat, 02/01/2014 - 17:35 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 02/01/2014 - 18:15 नवीन
आवडली कविता! येउ देत अजून.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 02/02/2014 - 00:31 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Sun, 02/02/2014 - 04:08 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sun, 02/02/2014 - 11:00 नवीन
भावना कळल्या! मनातील सल कवितेत उत्तम रीतीने उतरला आहे. जीवनात काही ध्येय/मंझील/goals नाही, हाच खरा चकवा आहे! त्यामुळेच मला ह्या असल्या कविता आवडत नाहीत(its my problem!). एक आवडलेले गाणे : मंझिले अपनी जगह है
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Sun, 02/02/2014 - 11:24 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Mon, 02/03/2014 - 10:35 नवीन
सुरेख...
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 02/03/2014 - 10:42 नवीन
यमकाकडे दुर्लक्ष केलं तर कविता छान आहे.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 02/03/2014 - 11:05 नवीन
सुंदर... आवडली. वर एक दोघांनी म्हटल्याप्रमाणे यमक अजून प्रभावी करता आलं असतं. पण तरीही; छान जमलीय...
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 02/03/2014 - 11:08 नवीन
खोल जातेय कविता. सुंदर अभिव्यक्ती. :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sun, 02/09/2014 - 04:56 नवीन
+१ माऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
M
michmadhura Mon, 02/03/2014 - 11:10 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 02/05/2014 - 22:39 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
स
सुधीर Fri, 02/07/2014 - 14:07 नवीन
पण थोडी निगेटीव्ह वाटली. हे खूप आवडलं, "हे श्वास ही होती तीर...."
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/09/2014 - 12:51 नवीन
आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा