Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा ची सवत!

प
पिवळा डांबिस यांनी
Sun, 02/02/2014 - 06:50  ·  लेख
लेख
मी आणि माझ्यासारखे अनेक लोकं मिपाचे फार पूर्वीपासूनचे सभासद आहेत. मी मिपावर नाही म्हंटलं तरी बर्‍यापैकी लेखनही केलेलं आहे. पण पूर्वीपासून इथे लेखन करण्यातली एक अडचण म्हणजे तुमच्या लेखनात जर फोटो टाकायचे असतील तर ते डायरेक्टली इथे टाकता येत नाहीत. त्यासाठी मग प्रथम फ्लिकरवर जा, तिथे फोटो लोड करा, आणि मग इथे त्या फोटोंची लिंक द्या वगैरे सव्यापसव्य करावं लागतं.... पूर्वी हे सगळं केलंही. पण आता स्वतःच्या ब्लॉगवर किंवा फेसबुकावर सरळ डायरेक्टली आपल्या लॅप्टॉपवरून फोटो अपलोड करता येतात. काम खूप सुटसुटीत होतं..... तर प्रश्न असा आहे की हे ब्लॉग आणि विशेषतः फेसबुक ही मिपा किंवा इतर तत्सम संस्थळांची सवत ठरतेय का? त्यांच्याकडे अशी काय टेक्नॉलॉजी आहे की जी ही संस्थळं उपयोगात आणू शकत नाहीत? अणि त्याबाबतीत या सर्व संस्थळांनी काही अ‍ॅक्शन घेऊन फेसबुकाच्या बरोबरीला येणं आवश्यक आहे का? माझा स्वतःचा अनुभव म्हणाल तर गेल्या काही महिन्यात मी फोटो सीरीज असलेले तीन धागे फेसबुकावर टाकले, एक अलास्कावर, एक (पाच अंकी)हवाई बेटांवर, आणि एक एका चॉकोलेट प्रदर्शनावर. त्यात लिहिण्यासारखं फारसं काही नव्हतं, फोटो हेच मुख्य आकर्षण होतं, अ पिक्चर स्पीक्स फॉर अ थावजंड वर्ड्स, म्हणतात तसं... इथेही ते द्यायची इच्छा तर होती पण खरं सांगतो, त्या इतक्या फोटोंसाठी ते फ्लिकरचं सव्यापसव्य करणं जिवावर आलं... याला काही उपाय आहे का? की फेसबुक हे या संस्थळांची सवत होऊन कानामागून तिखट होणार हेच भविष्य आहे? मी स्वतः काही आयटीवाला नाही पण इथे अनेक आयटी तज्ञ आहेत म्हणून जाहीर विचारतो, मंडळी, यावर काही उपाय सुचतोय का?

प्रतिक्रिया द्या
11942 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

व
विनायक प्रभू Tue, 02/04/2014 - 17:11 नवीन
मला वाटले.......... असो
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 02/04/2014 - 17:11 नवीन
मला वाटले.......... असो
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Wed, 02/05/2014 - 05:03 नवीन
फोटो इथे स्टोअर करत नाही हे उत्तमच आहे, त्याने काहीच बिघडले नाही जोवर इतरांच्या घरट्यात अंडी घालण्याची सोय आहे तोवर मिसळीने अकारण जागा खर्च करत बसू नये एक करता येइल फोटो टाकताना डायरेक्ट पिकासा किंवा चेपुवर जातील असे पहावे म्हणजे १. आधी पिकासावर जा फोटो अपलोड करा २. मग लिन्क मिसळीवर द्या... हे एकाच स्टेपमधे झाले तर पहा बाकी तुलना म्हणाल तर चेपु मिसळीशी बरोबरी करू शकत नाही, त्याला अनेक लिमिटेशन्स आहेत सध्या तर चेपुला भयानक आजार झाले आहेत... मिसळीइतके ते युजर फ्रेंडली नाही, पूर्ण स्क्रीनही चेपु वापरीत नाही. डावी उजवीकडची जागा चेपु वाया घालवते... बाकीही अनेक गोष्टी... मिसळ टेक्निकली उत्तम आहे तसेच इथल्या प्रतिसादकांनीही तिला खूप श्रीमंत केले आहे
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Wed, 02/05/2014 - 09:29 नवीन
महापरिनिर्वाण........... Image removed.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/05/2014 - 12:54 नवीन
फोटोची लिंक आल्बम मधून डायरेक्ट घेऊ नका. फोटो गुगलवर ओपन करा आणि मग तिथून फोटोची लिंक घ्या. नाहीतर लोक थेट आल्बमपर्यंत पोचतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा