'अद्वैत'
'अद्वैत'
खांद्यावर रूळते कुंतल बट नादान
ओठावर हलके स्मीत : कळ्यांचे रान !
क्षण एक अडकतो मत्स्य जसा जाळ्यात
नयनातुन उसळे इंद्रधनुष्यी बाण !
जणू संगमरवरी आरस्पानी कात
वक्षात धपापे चंद्र नवा बेभान
मनी बधीर भुंगा : भरकटतो विरक्त
रात्रीस कवळते आसक्ती वैराण !
नागीण विराजे लवलवती देहात
रक्तातुन तुटती तीव्र विजेचे ताण !
श्वासातुन उसळे राग असा बेफाम
रात्रीला छळते दूर उषेचे गान
बेशीस्त र्रुतुंच्या उजाड भिंतीवरती
अस्वस्थ उगवती लवलवती हे प्राण ।
गात्रात विरघळे गात्र असे बेफाम
देहात विजेचा लोळ उसवतो त्राण ।
अंधार युगांचा असा झळाळुन येतो,
प्रीतीत निथळते अद्वैताचे दान।
डॉ. सुनील अहिरराव
💬 प्रतिसाद
(2)
ज
जेपी
Sun, 02/02/2014 - 16:37
नवीन
काव्य आवडल .
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
Wed, 02/12/2014 - 03:34
नवीन
@ जेपी, धन्यवाद !
- Log in or register to post comments