१५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश
नमस्कार
आपणा सर्वांनाच माहिती आहे की १९४७ मध्ये झालेली भारताची फाळणी एक दुर्दैवी घटना होती. पाकीस्तान आणि बांग्लादेशात विभक्त झालेले प्रदेश भारतात उद्या परत आले तर तेही आपल्याला हवेच आहे. जर जर्मनीच पुर्नएकीकरण होऊ शकत व्हिएतनामच होऊ शकत तर भिविष्यातल्या कोणत्यातरी शुभ मुहूर्तावर एक ना एक दिवस पाकीस्तान आणि बांग्लादेशही भारतात येतील अशी आशा करता येईलच. या धाग्याच्या उद्दीष्टाकरता हे शांततामय मार्गाने होत आहे अस गृहीत धरून चालू (इतर मार्गांच्या चर्चेकरता वेगळा धागा काढला जाण्यास माझी ना नाही.)
१ अ) समजा तुम्ही एक सामान्य भारतीय नागरीक आहात. समजा एक पाकीस्तान अथवा बांग्लादेशातील एक लोकप्रीय तत्वज्ञ अथवा महापुरूष तुम्हाला मीत्र मानतो त्याला पाकीस्तान आणि बांग्लादेश या दोन्ही देशांना भारतात सामील होण्याच महत्व प्रतिपादन करत आवाहन करावयाच आहे ते तुम्ही कोणत्या शब्दात कराल ?
१ ब) तुम्ही भारतातील मुख्य विरोधी पक्षाचे अध्यक्ष आहात तर हे आवाहन तुम्ही कोणत्या शब्दात कराल
२ अ) समजा तुम्ही पाकीस्तान अथवा बांग्लादेशातील एक लोकप्रीय तत्वज्ञ अथवा महापुरूष आहात आणि तुम्हाला तुमच्या पाकीस्तानी बांधवांना भारतात सामील होण्याच आवाहन करायच आहे ते तुम्ही कसे (कोणत्या शब्दात) कराल ?
२ ब) समजा तुम्ही पाकीस्तान अथवा बांग्लादेशाचे राष्ट्राध्यक्ष आहात आणि आपला देश भारतात विलीन करण्याच महत्व तुम्हाला पटलेल आहे आणि ते मह्त्व तुम्ही तुमच्या पाकीस्तानी बांग्लादेशी बांधवांना महत्व समजावून देत आवाहनाच राष्ट्रास उद्देशून भाषण देत आहात ते तुम्ही कोणत्या शब्दा लिहाल ?
३) पाकीस्तान आणि बांग्लादेश भारतात सामील होण्यास आपखुषीने राजी झाले आहेत हा सुवर्णक्षणाचे स्वागत करण्याची जबाबदारी भारताचे राष्ट्रपती म्हणून तुमच्यावर येऊन पार पडते तुम्ही त्यांचे पाकीस्तान आणि बांग्लादेशाच्या विलिनीकरणाचे भाषण कोणत्या शब्दात कराल ? किंवा १५ ऑगस्ट इ.स.२९४७ च्या आधीच विलिनीकरण होऊन गेल आहे आणि १५ ऑगस्ट इ.स.२९४७ ला या सुवर्ण क्षणांच्या स्मृतीस उजाळा तुम्ही कोणत्या शब्दात द्याल ?
विषयांतर टाळण्याकरता धन्यवाद
प्रतिक्रिया