Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक गीत

उ — उदय सप्रे, गुरुवार, 02/06/2014 - 11:49
सप्रेम नमस्कार रसिक आणि कलाप्रेमी मि.पा.कर, आज बर्‍याच दिवसांनी काही लिहित आहे.मूळ गाणे हिंदी आहे , त्यावरून - अर्थ तोच ठेवून लिहिण्याचा प्रयत्न केलाय.पाहुया कुणी ओळखतय का मूळ गाणे. ना कुणाचा मी ना कोणीच झाले माझे इथे, परके तर जाऊद्या, सख्ख्यांचा आधार नाही जिथे ! एरवी लोक जिथे रडकेही जिणे जगती की, अन् माझ्या हसण्याचा ही लागला निभाव कुठे? हाय मी काय असे प्रेमाखेरीज मागितले? तेव्हढेही का न समाजास झाले मान्य इथे? बघ किती तारका चमचमती तुझ्या ठायी नभा, ना कधी न्हायले हे भाग्य चांदण्यात इथे! पुढील कडवे मात्र नवीन आहे बघ तुझा हात फिरे, आंधळ्यास ये दृष्टी, ये फिरुन परतुनी, डोळ्यांस ना काहीच दिसे ! ----------------------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे.

प्रतिक्रिया द्या
1366 वाचन

💬 प्रतिसाद (5)
आ
आतिवास गुरुवार, 02/06/2014 - 13:56 नवीन
नाही कळलं मूळ गाणं :-(
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 02/06/2014 - 14:31 नवीन
मूळ गाणं कळत नाहीये अजून तरी. पण छान आहे. :)
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल गुरुवार, 02/06/2014 - 15:30 नवीन
इस भरी दुनिया में कोई हमारा ना हुआ गैर तो गैरे थे अपनों का सहारा ना हुआ....
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 02/07/2014 - 09:11 नवीन
रूपांतर छान झालंय.
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Fri, 02/07/2014 - 09:16 नवीन
ज्योति, तुम्ही या मूळ गाण्याची चाल माहित असेल तर मराठी गाणे त्याच चालीत म्हणून बघा, त्याच मीटरवर आहे हे गाणे ! बघा आणि कळवा कसं वाटतंय ते. धन्यवाद, उदय सप्रेम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा