Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"मोटो -जी" ची क्रेझ

उ
उडन खटोला यांनी
Sat, 02/08/2014 - 11:07  ·  लेख
लेख
मोटोरोला या कंपनीचे नुकतेच गुगल कडून लीनोव्हो कडे हस्तांतरण झाले . गेली काही वर्षे samsung आणि apple च्या स्पर्धेत इतर कंपन्यांचा प्राण कंठाशी आला होता . त्यात भारतीय बाजारपेठेत micromax आणि kaarbon / lava सारख्या कंपन्यांनी आपले स्थान निर्माण केलेलं होतं . अशा परीस्थितीत मोटोरोला चा नवा "मोटो -जी" या मॉडेल कडे game -changer म्हणून पाहिले जात आहे। ५. इंची स्क्रीन ,१ जीबी RAM , १. २ GHz प्रोसेसर आणि android kitkat update सह १६ जीबी इंटर्नल मेमरी , ५ MP कॅमेरा इत्यादी वेधक वैशिष्ट्यांनी सजलेला हा फोन flipkart वरून फक्त १४,०००/- ला घरपोच उपलब्ध असल्याने ग्राहकांच्या उड्या पडल्या नसत्या तरच नवल! लॉंच केल्यापासून हा फोन overbooked असून out -of -stock आहे, इतका लोकप्रिय ठरला आहे. "मोटो -जी" च्या या क्रेझ बद्दल आणि फोन बद्दल आपली मते जाणून घेणे जरूर आवडेल …

प्रतिक्रिया द्या
29446 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

य
यसवायजी गुरुवार, 01/01/2015 - 18:38 नवीन
जस्स स्विचॉफ्फ करून परत ट्राय केलं. पण यावेळी फोन 'डेड' नव्हता. त्यामुळे कदाचीत, दोन मिनिटानंतर 'नॉर्मल बूट' झाला. पहावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/01/2015 - 18:40 नवीन
Plug it into the charger Hold the VOL DOWN key While still holding the VOL DOWN key, press and hold the POWER key Hold both keys down for over 120 seconds. This is more than two minutes and will seem like a long time. You might want to time yourself to make sure you hold it longer than two minutes. After holding the keys down for more than two minutes, release them. The Flash Boot screen will display, and the Normal Reboot option will be highlighted Press the VOL UP key and the device will start a normal reboot.
सदर सूचना आणि कर्तव्य.. मराठीत-काढून देता येइल काय? __/\__ फार बरे होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी गुरुवार, 01/01/2015 - 18:59 नवीन
मोब्या चार्जीन्गला लावा. "आव्वाज कमी!" बटण दाबून ठेवा. ते तसेच दाबले असताना, आता "पावरबाज" बटनसुद्धा दाबा. दोन्ही 'कळा' दाबलेल्या अवस्थेत असताना तब्बल दोन मिंटे स्वतः कळ सोसून स्वस्त बसा.. (नंतर बोटं मोडालंच माझ्या नावाने दुखताहेत म्हणून) आता मोकळे व्हा. म्हणजे बोटं मोकळी करा. 'फ्लॅश बूट स्क्रीन' चमकेल, आणि 'नॉर्मल रिबूट' पर्याय दिसेल. आता आवाज वर चढवणारी कळ दाबा आणि फोन चालू होईल. आता एक बार लावा. योउ हवे दोने इत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/01/2015 - 19:41 नवीन
आता एक बार लावा. योउ हवे दोने इत. >>> अत्यंत धण्यवाद्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
श
श्रीगुरुजी Fri, 01/02/2015 - 09:28 नवीन
सविस्तर मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक आभार! या धाग्यावर आधीच समस्या लिहायला हवी होती, म्हणजे सेवाकेंद्राचे दोन हेलपाटे टळले असते. असो. काही वेळापूर्वीच सेवा केंद्रातून फोन दुरूस्त झाल्याचा फोन आलाय. ३ दिवसांपूर्वी दुरूस्तीला देताना कमीतकमी ८ दिवसांचा अंदाज दिला होता. पण ३ दिवसात दुरूस्त झालाय, म्हणजे तुम्ही वर लिहिलेली किंवा तशीच प्रक्रिया केली असावी. ओएस परत लोड केली नसली तर बरं होईल. नाहीतर सगळा डाटा परत टाकावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
ग
ग्रेटथिंकर गुरुवार, 01/01/2015 - 18:19 नवीन
नोकिया घेतलाय ना गुर्जी तुमी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 01/02/2015 - 09:31 नवीन
नानासाहेब, मोकिया ल्युमिया ५३५ दोन आठवड्यांपूर्वी मुलीसाठी घेतला. मोटो-जी आमच्या सौ. वापरतात. म्हणून तर बंद पडल्यापडल्या धावपळ करून सेवाकेंद्रात जावे लागले. जरा चालढकल केली असती तर आमची काही खैर नव्हती. आम्ही स्वतः कार्बन ए-२१ वापरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
र
रुस्तम गुरुवार, 01/01/2015 - 17:14 नवीन
मार्च २०१४ मधे कंपनीत आम्ही ५ जणांनी मोटो जी एकदम घेतला होता. अजुन तरी कोणाला काही प्रॉब्लम नाही.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 01/01/2015 - 23:32 नवीन
मी मोटो जी सेकंड जनरेशन घेतला. मामॅ मेल्यामुळे. २ मेले. सद्ध्या मोटोची काही तक्रार नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 01/02/2015 - 03:51 नवीन
कृपया या ८फेब्रु २०१४ च्या धाग्यात अपडेटस टाकू नका. १ जाने २०१५ चा नवा धागा काढावा उडनखटोलाजी मोटोजी साठी. मोबाईलच्या बाबतीत एक वर्ष म्हणजे कोणे एके काळी आटपाट नगरात मोटोजी राज्य करत होता असं लिहावं लागतंय. दर एक दीड वर्षानी दहा पंधरा हजारांचे फोन बदलू शकणांऱ्यांची मतं वेगळी असतात (=एक कंजूस विचार.)
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Fri, 01/02/2015 - 04:40 नवीन
फेब्रुवारी २०१४ ला १६ जी बी वाला मोटो -जी घेतला . भारी handset आहे . तक्रारीला जागा नाही . निर्णय बरोबर ठरला
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Fri, 01/02/2015 - 05:36 नवीन
मीदेखील मार्च २०१४ ला घेतला मोटो-जी .अपडेट मारून व्यवस्थित चालू आहे. काहीही तक्रार नाही. आणि मुख्य म्हणजे सॅमसंग सारखा ६-७ महिन्यानी सतत हँग होत नाही ,हा प्लस पॉईंट!
  • Log in or register to post comments
G
Gayatri Muley Fri, 01/02/2015 - 10:26 नवीन
asus झेनफोन सुद्धा एक चेंज म्हणून छान पर्याय आहे. मागील 6 महिन्या पासून वापरत आहे, अजुन तरी काही ही प्रॉब्लेम आलेला नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा