Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बरंच बरंच काही...

ज — जुईचे फूल, Tue, 02/11/2014 - 02:32
आकांक्षेच्या भरारीने उजळून निघतं सारं आणि "जगण्या"च्या काळोखात भरडून निघतं सारं मनाला उभारी मिळता मिळता ध्यास कोलमडत जातो हाकेच्या अंतरावरला हेतूही दिसेनासा होतो तरीही... धावत आलो, धावत असतो, धावत राहणार मी भविष्याच्या पडद्याआड साचलेलं पहाणार मी शोधत राहणार सुख-बिख फिरत दिशा दाही तुझ्या माझ्यात घडत राहतं बरंच बरंच काही जाणीव नेणीवेच्या मधेच मी झुलत राहतो असाच आत बरंच वाटत राहतं, बाहेर काही तिसराच बदलण्याचा आव... मात्र काळ वहाणारच असतो हाताची घडी तोंडावर बोट मी खरा असाच असतो पोखरत असतं हेच सारं पण समोर आणायचं नाही दाखवत रहायचा वेगळाच चेहरा आपण तसे नाही बदलत रहायचं कॅलेंडर आज एक उद्या दोन प्रश्न कधीच पाडायचा नाही तू कोण? मी कोण? तरीही कुठून येतं सारं बळ कधीच कळत नाही तुझ्या माझ्यात घडत राहतं बरंच बरंच काही डोकावतोस अधे मधे हळूच वाट चुकल्यासारखा क्षणिक आत वळवतोस बाकी दिसतोस पसाऱ्यासारखा कान, नाक, डोळे सारे मनाचे दूत होतात पसरलेल्या पसाऱ्यात क्षणात फिरवून आणतात हा क्षण आत डोकावण्यापेक्षा कैक पटींनी मोठा होतो कळत नाही कोण मोठा तिथेच सारा लोचा होतो "चाचपडत राहणे" वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग होतो अर्थ मात्र त्याचा इथे "जगणे" असा होतो दाखवत राहतोस अगणित लीला बघत राहतो मीही तुझ्या माझ्यात घडत राहतं बरंच बरंच काही शोधेन म्हणतो स्वत:ला आतल्या अंधारात जगेन म्हणतो आतही जसा चाचपडतो बाह्यात माहितीये मला हे सारं इथेच संपणार नाही तुझ्या माझ्यात घडत राहणार बरंच बरंच काही

प्रतिक्रिया द्या
792 वाचन

💬 प्रतिसाद (2)
P
psajid Tue, 02/11/2014 - 06:02 नवीन
कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांच्या कवितेची आठवण आली. ज्यामध्ये त्यांनी मुलाच्या मनातील भावना ओळखायचा प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे व्यक्त केला आहे.
  • Log in or register to post comments
M
michmadhura Tue, 02/11/2014 - 06:05 नवीन
खूप आवडले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा