मन रे
मन रे धाव रोखुनी घे
सरती मागे सोस वयाचे
निजलेले ना अजुनी जागे
रोज सकाळी सायंकाळी
काळ सरकतो मागे
मन रे धाव रोखुनी घे…….
असलेले ओंजळीतले जग
श्वास तयास लगडलेले बघ
घे पिउनी अमृत भरलेले
ते जितके तितकेच पुरेसे
जगण्या अधिक न लागे
मन रे धाव रोखुनी घे…….
मरण अखेरी शून्य सोबती
झुळुक वादळे येती जाती
वातीविण तेवे ना पणती
धर छाया कळवळते ज्योती
व्यर्थ मानवी दंगे
मन रे धाव रोखुनी घे…….
……………. अज्ञात
💬 प्रतिसाद
(4)
आ
आयुर्हित
Wed, 02/12/2014 - 12:48
नवीन
घे पिउनी अमृत भरलेले
ते जितके तितकेच पुरेसे
जगण्या अधिक न लागे
१००% सहमत
एकदा जर अमृत पिले तर मरणाची कसली आली भीती?
पण "मन रे धाव रोखुनी घे" हे काही पटले नाही.
नकारात्मक का झालात आपण आज?
रोज सकाळी सायंकाळी
काळ सरकतो मागे:-- तर अजून जोरात धावयाला हवे, नाही?
धर छाया कळवळते ज्योती
व्यर्थ मानवी दंगे:---हे तर डोक्यावरून गेले
- Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल
Mon, 02/17/2014 - 14:20
नवीन
तुमचं काही अंशी पटलं मला. म्हणजे मला जे अभिप्रेत आहे ते नीटसं मांडालं गेलं नाही असा त्याचा अर्थ घेतला पाहिजे मी.
खर तर हे नकारात्मक नाहीये. जगण्यापुरेसं मिळाल्यावर त्यामागे अधिक धावणं थांबव असं हे मनाला केलेलं अर्जव आहे. "मानवी दंगे" म्हणजे मनात उठणारी द्विधेची वादळे आता थांबली पाहिजेत आणि जन्माच्या उद्दिष्टांचा शोध घ्यायला हवा म्हणून " धाव रोखुनी घे " आणि मरणाच्या आधी त्याचा प्रयत्न कर असा आशय मला उधृत करायचा आहे.
आपल्या प्रांजळ मतांचा मी मनापासून आदर करतो. असाच लोभ असू द्यावा. :)
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Wed, 02/12/2014 - 15:29
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Mon, 02/17/2014 - 16:39
नवीन
मस्त कविता,स्पष्ट केल्या मुळे अर्थ ही कळला.
- Log in or register to post comments