पुन्हा टोलचा घोळ!
राज ठाकरे पुण्यात गरजले ते निव्वळ टोलचा मुद्दा घेऊनच. त्या सभेचे कवित्व सभेच्या जागेपासून सुरु झाले होते.
कुण्या वरिष्ठ राष्ट्रवादी नेत्याच्या मध्यस्थीमुळे सपचे पटांगण सभेला मिळाले अशी कुजबूज होती.
सरकारी टाळक्यात नारळ हाणण्याची रांगडी भाषा केली गेली तरी शिवसेनेला असेच वाटते आहे की सरकारने फूस देऊन मनसेला हे खोटे अवसान आणायला सांगितले आहे. ह्यात काही अर्थ नाही असे शिवसेनेला वाटते.
http://saamana.com/2014/February/11/agralekh.htm
दुसरीकडे मनसेने मोठी आश्वासने देऊन काहीही केलेले नाही (विकासाची ब्लू प्रिंट वगैरे). निव्वळ उत्तम भाषणबाजी. त्यामुळे मनसेला अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. तशात आप महाराष्ट्रप्रांती उदयास आले तर राजसाहेबांचा काळ कठिण आहे.
एकंदरीत टोलविषयी अफाट असंतोष खदखदतो आहे हे उघड आहे. निवडणुका इतक्या जवळ आलेल्या असताना, मोठा फटका बसू शकेल अशी भीती असतानाही सरकार ह्याविषयी काही करायला तयार नाही हे अनाकलनीय आहे. बहुधा तसे
काही केले तर पक्षनिधीत घट होईल अशी भीती असावी. एकंदरीत पृथ्वीराज चव्हाण हा बिनपगडीचा मनमोहनसिंग आहे हे राज ठाकर्यांचे विधान अगदी पटण्यासारखे आहे.
भाजपाचे दुर्योधन आणि दु:शासन (अर्थात मुंडे व गडकरी) टोलबाबत परस्परविरोधी भूमिकेत आहे.
बुधवारचे आंदोलन लवकरच सुरु होईल तेव्हा काय ते कळेलच. हे आंदोलन शांततापूर्ण झाले तर मला आश्चर्याचा जोरदार धक्का बसेल. एकंदरीत जितका राग ह्या प्रकाराबद्दल आहे तो बघता लोक शांत बसणार नाहीत असेच वाटते आहे.
ह्याविषयाला धरून काही चर्चा इथे पहाता येतील.
http://www.youtube.com/watch?v=80lT9GJtpmE
http://www.youtube.com/watch?v=5q8MXxav8II
प्रतिक्रिया