रंग
सुरेख कलाकृती, ईश्वरी निसर्ग छंद
कणा काणात दाटला, खुलला रंग रंग ll १ ll
निळ्या नभावरी, आरंभ लख्ख सूर्य
कृष्ण रजनी मिरवी, तारका शुभ्र रंग ll २ ll
सृष्टी पांघरे, वनराई गर्द हिरवाई
तेथ नटले कितीक, सुबक पंख रंग ll ३ ll
निळ्या गगनातळी, खळाळे जल निळाई
गूढ तयात मिसळती, जीव कैक रंगारंग ll ४ ll
उन्हात माळवरती, देह वृक्ष निष्पर्ण
निरोप सावळा मेघ, उमेद जीवनरंग ll ५ ll
नाजूक धागा नात्याचा, भासता जीर्ण
समेट घट्ट सांधितो, पुन्हा प्रेंमरंग ll ६ ll
सोसता एकांत, व्यथा वा दर्द
तो आधार एक, भावभक्ती पावन रंग ll ७ ll
- सार्थबोध
www.saarthbodh.com
💬 प्रतिसाद
(2)
आ
आयुर्हित
Wed, 02/12/2014 - 09:52
नवीन
ईश्वर, निसर्ग व सृष्टीचे चांगले वर्णन केले आहे.
निरोप सावळा मेघ, उमेद जीवनरंग
१०१% सहमत.
उन्हात माळवरती, देह वृक्ष निष्पर्ण
निरोप सावळा मेघ, उमेद जीवनरंग ll ५ ll
यांत "निष्पर्ण वृक्ष" शिशिराचे तर "सावळा मेघ" वर्षा ऋतू दर्शवित आहेत, परंतु वसंत ऋतू विसरलात असे वाटते.
ग्रीष्मात ऊन असते, पण वृक्ष निष्पर्ण नसतात. (माझ्या मते, यात काही चांगला बदल करायची संधी आहे.)
सोसता एकांत, व्यथा वा दर्द
तो आधार एक, भावभक्ती पावन रंग ll ७ ll
यातील प्रस्ताव (approach) चुकीचा वाटतो किंवा अंधश्रद्धा वाटते. यात नुसते देव देव करून एकांत, व्यथा वा दर्द कमी होणार नाहीत. तर चांगला मार्ग शोधण्यासाठी देवाचा/गुरूंचा आधार नक्कीच घ्यावा. इतर रंजल्या गांजल्या लोकांना होणारा त्रास दूर केला तर आपलाही त्रास दूर होतो, असेच माझे मत आहे.
एकंदरीत चांगला प्रयत्न आहे असेच मी म्हणेन. अजून नवीन कविता येऊ द्यात!
- Log in or register to post comments
म
मोक्षदा
Wed, 02/12/2014 - 13:27
नवीन
सुन्दर
- Log in or register to post comments