Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच"

व — वैभवकुमारन, Wed, 02/12/2014 - 13:05
"नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच" (व्याकरणामध्ये चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे) भांड्याला भांडे लागणारच शब्दाने शब्द वाढणारच ती त्याचे म्हणणे खोडनारच तो एक शीवी हासडून बोलणारच नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||1|| वातावरण शांत होते न होते तेवढ्यात …… … तीचे ओठात पुटपुटने होणारच परत ह्याचा पारा चढणारच मग काचेचा ग्लास कोणी फोडणारच भरल्या घरात हे असे घडणारच नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||2|| मग ती थोडी पडती बाजू घेते न घेते तेवढ्यात ...... तो मागचे उकरून काढणारच नुसता जीव तोडून भांडणारच आगदी स्वतःच्याच लग्नाची जुनी पत्रीका फाडणाराच नवऱ्याचा अहंभाव पुढे मांडनारच नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||3|| मग ती काही न बोलता स्वयंपाकघरात कणीक मळत बसते तेवढ्यात तिचे मुसमुसून हुंदके होणारच मग हा चोरून तीच्याकडे पाहणारच थोडे त्यालाही वाईट वाटणारच तोही एक आवंढा घोटणाराच नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||4|| आता दोघेही शांत , शब्दही शांत… अगदी अनोळख्यासारखे… तेवढ्यात तो हळूच तिच्याकडे जाणारच लाडिक मीठीत घेणारच तीही …. माफी मागणारच भरल्या घरात हे अस घडणारच नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||5||

प्रतिक्रिया द्या
7332 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
प्रचेतस Wed, 02/12/2014 - 13:06 नवीन
चान चान.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Wed, 02/12/2014 - 13:41 नवीन
चालु द्या जोरात, फक्त शेवटी प्रेम व साथ द्या एकमेकाला म्हणजे झाले! उत्तम निरीक्षण व कविता. धन्यवाद
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 02/12/2014 - 15:11 नवीन
तीही …. माफी मागणारच- *aggressive* >:o >:O >+O >:o >+o :-@ :angry:काही चुकल्या सारख वाटत (लग्नाचा २५ हून जास्त वर्षांचा अनुभव) . बाकी मस्त
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री Sat, 02/15/2014 - 09:33 नवीन
तीही …. माफी मागणारच- काही चुकल्या सारख वाटत (लग्नाचा २५ हून जास्त वर्षांचा अनुभव) . >>> बाकी जोडी तुझी माझी हा कार्यक्रम जरूर पाहावा (महाग्रूंचा असला तरी ) ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
म
मुक्त विहारि Wed, 02/12/2014 - 15:20 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/13/2014 - 05:17 नवीन
कै च्या कै कविता! असो'
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 02/14/2014 - 11:01 नवीन
तुम्ही कविता लिहणारच आम्ही ती वाचणारच वाचून प्रतिक्रिया देणारच अहो कवी भॉ हे "च" खूपच झालेच की हो...
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 02/14/2014 - 11:38 नवीन
तो एक शीवी हासडून बोलणारच हीच खरेच कविकल्पनाच आहे...........च !
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Sat, 02/15/2014 - 08:01 नवीन
क्डव्याच्या शेवटी तेवढ्यातच लिहायचा प्रकार छान आहे :)
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक गुरुवार, 02/20/2014 - 10:07 नवीन
छान .
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानव गुरुवार, 02/20/2014 - 10:15 नवीन
कविता वाचून जास्त गम्मत वाटली.... बाकी बायको वगैरे हायली इंफ्लेमेबल विषयात हात न घालणेच बरे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/20/2014 - 10:29 नवीन
चुर्रर्र...चुर्र्र्रर....चुर्र्र्र्र...! =))
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा