Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मदिरा स्तोत्र

न — नेत्रा वैद्य, Wed, 02/12/2014 - 14:53
मद्य मदिरा सुरा दारु, प्रसिध्द नामांनी असे | तीन प्रहरी प्राशिता ती, गाढ निद्रा येतसे|| रिचविता ते पेग पेग, जडत्व कायेचे नुरे | चालतानां भूमीवरुनी, स्थिर पाऊल ना ठरे || होऊनी आरक्त नेत्र, जीभ जड ती होतसे | धरेवरती स्वर्ग उतरे, कि स्वतः स्वर्गी वसे || सुरवरांना सुरा प्रिय, अप्सरांचा सवे जथा | दुग्ध शर्करा योग ऐसा, मदिराक्षी सवे सुरा || जन्म त्याचा वृथा झाला, आनंदासी मुकला | एकच प्याला नाही, ज्याने कधी तो प्राशिला || वास्तवाची जाण येता, दु:खी जीव तो होतसे | त्यापरि नशा बरी, दु:ख विस्मरण होतसे || जीन रम व्होडका, अन् गाळलेली गावठी | जातकुळी एक त्यांची, लाविता तो पेग ओठी || चकणा नामे ज्ञात असती, खारे काजू शेंगदाणे | एक मात्र जगन्मान्य, चकण्यासवे पिणे || इति नेत्रा विरचित मदिरा स्तोत्रम् दारुबाज प्रित्यर्थं समर्पितम्

प्रतिक्रिया द्या
2886 वाचन

💬 प्रतिसाद (11)
आ
आत्मशून्य Wed, 02/12/2014 - 14:55 नवीन
पेग भरलेला हवा याचा मित्रांना आग्रह करतो.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 02/12/2014 - 14:59 नवीन
कविता छान आहे. वृत्तात अजून ठोकून बसवायला वाव जरूर आहे पण जे आहे तेही उत्तमच.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/12/2014 - 15:01 नवीन
छान उत्तम आवडले
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 02/12/2014 - 15:06 नवीन
'दागु पीना हगाम है|
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 02/12/2014 - 15:15 नवीन
छान मस्त . कुजक-माजक खाईन, झिंगात येईन. गटरात लोळीन, स्वर्गसुख भोगीन.
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Wed, 02/12/2014 - 18:17 नवीन
झकास विडंबन. असेच लिहा.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Wed, 02/12/2014 - 19:35 नवीन
लाल रंगी, बहुगुणी, नाम तिचे वारुणी| रोज एक पेग घेता, पळतील सारी दुखणी|| फक्त एक काळजी घ्यावी,खातांना तो चकणा| मेद व वजन वृद्धी नियंत्रणा, मारू नका बकाणा|| कविता उत्तम झाली आहे, प्रत्यक्ष अनुभव कामी आलेले दिसतात!
  • Log in or register to post comments
न
नेत्रा वैद्य गुरुवार, 02/13/2014 - 15:28 नवीन
प्रतिसादाकरिता धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि गुरुवार, 02/13/2014 - 16:16 नवीन
मला कवितेतले काही कळत नाही पण मदिरा हे वाचून इथे आलो! छान लिहीले आहे. - (मदिरा 'स्तोत्रि') सोकाजी
  • Log in or register to post comments
भ
भटक्य आणि उनाड Fri, 02/14/2014 - 13:18 नवीन
चालु द्या..
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया...... Wed, 03/05/2014 - 16:53 नवीन
क्या बात है!! जमलंय. बाकी अनुभव दांडगा आहे म्हणायचा..... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . काव्य लिहिण्याचा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा