पाककृती

चिकन कबाब

Primary tabs

चिकन कबाब:
चिकन कबाब

झटपट साहित्य :
२०० ग्राम बोनलेस चिकन(ब्रेस्ट)चे छोटे तुकडे,
ताजे दही: ४ चमचे,
अर्ध्या लिंबाचा रस,
हळद: १ चमचा,
तिखट: १/२ चमचा,
गोडामसाला:१/२ चमचा
धनेपूड: २ चमचे,
मिरीपूड: पाव चमचा
मीठ: अर्धा चमचा/ चवीप्रमाणे
तेल: ३ चमचे

झटपट कृती: तेलाव्यतिरिक्त इतर सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून, कालवून ४ तासासाठी चिकन फ्रीज मध्ये मेरीनेशनसाठी ठेवावे. रंगाचा(कलरचा)वापर मुद्दाम टाळला आहे.
मेरीनेट

बेकिंग डिश मध्ये २ चमचे तेल पसरवावे.
डिश

त्यावर मेरीनेटेड चिकनचे पिसेस ठेवावेत.
पिसेस

आधी ७-८ मिनिट मायक्रोव्हेव ओवन मध्ये ग्रील करावे वरून ब्रशने १ चमचा तेल लावून परत ५ मिनिट ग्रील करावेत.
हाफ वे

कोथिंबीरची चटणी, लिंबू, कांदा सोबत गरमागरम सर्व्ह करावेत.
सर्विंग

सर्वांसोबत चवीने ताव मारत "हर दिन दिवाली" साजरी करावी.
ताव मारा !

प्रकार: तामसिक सामिष आहार
एकूण ३७० कॅलरीज, प्रोटीन्स: १५० ग्राम्स, फायबर: ५ ग्राम्स.
सात्विक आहारासाठी चिकन पिसेस ऐवजी ताजे पनीर/सोयाबीन टोफू वापरावे.

सर्वांना "Happy Valentine Day"

जेपी

पाक्रु आवडली.
जमल्यास खायला बोलवा . मग तुमी आमचे लाडके होताल .(हघ्या)

अवांतर - चित्रगुप्तजीचां पेन्थलिसा वरचा धागा उडाला .कारण कळेल का?नायतर बबन ला ईकडे बोलावावे लागेल.वेगळ्या पुरुष विभागासाठी

सुबोध खरे

फोटो दिसत नाहीत..
चिकन मध्ये साधारण ३०% प्रथीने असतात म्हणजे २०० ग्राम मध्ये ६० ग्राम (१५० ग्राम शक्य नाही)
चरबी (स्किन काढली असल्यास ४ %) म्हणजे ८ ग्राम अधिक ३ चमचे तेल (४५ ग्राम) म्हणजे ५३ ग्राम.
सुदृढ माणसानी बेताने खावे. "स्पा" सारख्या माणसानी दाबून खावे.

दिपक.कुवेत

असं चित्र क्षणभर डोळ्यासमोर उभं राहुन -------- :D (खरं तर गडाबडा लोळायची स्मायली कशी टाकतात?)

दिपक.कुवेत

आता तर तु वजन वाढवायचं मनावर घेच मग कोणी तुला "दाबु" शकणार नाहि!

प्यारे१

हे असंच असतं का डॉ साहेब?

माझ्या चुलतकाकांचं वजन ४५ च्या आसपास होतं तरीही त्यांना अ‍ॅटॅक आला नि गेले. आयुष्यभर. २००९ मध्ये साधारण ६२- ६३ वय होऊन गेले.

कमी वजनाच्या माणसानं उगाच दाबून खाल्लं तर चालतं का?

सुबोध खरे

आवले साहेब,
स्पा आहे लग्न न झालेला. शिवाय बिचारा फार दिवसापासून वजन वाढवण्याच्या मागे लागला आहे. त्याने नाहि खायचे तर कुणी खायचे? तिशीच्या आत दगड खाल्ले तरी पचतात.खाउ द्या की सुखाने.

इरसाल

आय एम गणेशा फॉर धिस धागा ओन्ली.

एकीकडे मधुमेहावर धागा पेटता ठेवता आणि पुन्हा वर हे असले धागे टाकता ???
त्रिवार धिक्कार :) :)

गवि

उत्तम पाक्रु.
बाकी खरेसाहेबांच्या सल्ल्यामुळे तोंड बंद करुन घेतले आहे.

ता.क.

आण्णा पावशांच्या बिर्हाडातून फुलांच्या द्रोणांच्या पत्रावळीतून अंड्याची टरफले ??

आयुर्हित

सुबोध खरे साहेब: खालून वरून खरपूस भाजले जावे व डिशला चिकटू नये म्हणून तेल लावत असतो, त्यातले ८०% तेल हे डिश मध्येच शिल्लक राहते व वाया जाते. खाण्यात अगदी कमी येते. तरीही कॅलरीज हिशेब ठेवणे गरजेचे आहेच.

अत्रन्गि पाउस साहेब: ही डिश खास मधुमेह रुग्णासाठीच तयार केली आहे. कॅलरीज लक्षात घेऊन प्रमाण ठरवावे व मजा घ्यावी. चटणी सोबत चिकन, दही, मसाले व तेल ही उत्तमच आहेत मधुमेह रुग्णासाठी. त्यामुळे कृपया धिक्कार मागे घ्यावा व धन्यवाद म्हणावे, हि विनंती.

माझा प्रतिसाद विनोदाने घेतला जाईल अशी अपेक्षा...अहो स्मायली आहे कि...
असो...

गणपा

पहिलाच फोटो पाहुन टोंपासु.

शिद

जबरा दिसताहेत चिकन कबाब... ह्या विकांताला नक्की करुन पाहणार/चाखणार.

भारी.. हे असले काही हॉटेलातच खाणे नशिबी.. उद्या गाठायला हवे एखादे.. ;)

दिपक.कुवेत

पण डिश अपुर्ण आहे......सोबत एखाद कॉकटेल (डाएट???), मॉकटेल किमान गेला बाजार चिल्ड बियर तरी हवी.

एकूण ३७० कॅलरीज, प्रोटीन्स: १५० ग्राम्स, फायबर: ५ ग्राम्स.

यात काहीतरी गल्लत आहे. प्रत्येक प्रोटीनच्या ग्रॅममध्ये सुमारे ५ कॅलरी असतात. २०० ग्रॅम चिकनमध्ये सुमारे ४० ते ४५ ग्रॅम प्रोटिन असतं, आणि सुमारे २२५ कॅलरी असतात. तेव्हा माझा अंदाज असा आहे की तेल दही वगैरे धरून ३७० कॅलरी असू शकतील पण प्रोटीन ५० ग्रॅमपेक्षा कमी असावेत. (४० ते ४५ ग्रॅम म्हणजेसुद्धा भरपूरच प्रोटिन झालं.) तसंच चिकनमधून काही फायबर मिळत नाही - तेव्हा ५ ग्रॅम फायबर कुठून आलं हाही प्रश्नच आहे.

आयुर्हित

मटण/चिकनमधून काही फायबर मिळत नाही, हे अगदी बरोबर आहे.
त्यामुळे त्यासोबत कोथिंबीर+जिरे चटणी दिली आहे (त्यात सुद्धा जास्तीत जास्त कोवळ्या काड्या टाकल्यात)जेणेकरून फायबर जितके जास्त येतील तितके चांगलेच आहे.

फायबरचा मुद्दा गौण होता. प्रोटीनचा हिशोब खूपच चुकला आहे. तो संपादकांना दुरुस्त करायला सांगावा.

आयुर्हित

प्रोटीन्स चे प्रमाण चुकले आहे प्रोटीन्स: 38 ग्राम्स असा बदल हवाय
धन्यवाद खरे साहेब आणि राजेशजी!