Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टेंडर

च — चाणक्य, Sat, 02/15/2014 - 05:00
टेंडर काढा....साहेब म्हणाले त्या सरकारी कार्यालयाची भिंत ओल पकडत होती गेले काही महीने एक वेळ छप्पर गळकं असलं तरी चालतं पण आधार देणा-या भिंतीच जर कमकुवत झाल्या तर कसं चालेल...नाही का? तर टेंडर काढा...साहेब म्हणाले...भिंती रंगवून घेऊ . . . रंगारी आले मग भिंत केली साफ घड्याळ, कॅलेंडर, गांधीजींची तसबीर, नोटीस बोर्ड, चिकटवलेल्या नोटीसा, सुट्ट्यांची लीस्ट सगळं सगळं काढलं आणि दिला रंग छानसा शेड तीच पण तरी छान वाटत होतं सगळ्यांना घड्याळ, कॅलेंडर, गांधीजींची तसबीर, नोटीस बोर्ड, चिकटवलेल्या नोटीसा, सुट्ट्यांची लीस्ट गेलं परत आपापल्या जागी साहेब खुश...काहीतरी काम झालं ऑफिसात म्हणून पण पंधरा एक दिवस आणि परत ओल साहेबांनी काढलं मग नवं टेंडर...वॉटरप्रूफिंगचं आणि घेतलं काम करून परत आले रंगारी घड्याळ, कॅलेंडर, गांधीजींची तसबीर, नोटीस बोर्ड, चिकटवलेल्या नोटीसा, सुट्ट्यांची लीस्ट सगळं काढलं परत आणि परत रंग देऊन गेले पण लांब सोडून आलेल्या मांजरीच्या पिल्लासारखी परत परत येत होती भिंतीला ओल कोणालाच कळेना त्या रूक्ष कार्यालयात कुठून येतीये ही ओल तिस-यांदा रंग देऊन झाल्यावर जेव्हा शिपाई लावत होता वस्तू भिंतीवर घड्याळ, कॅलेंडर, नोटीस बोर्ड लावल्यावर गांधींची तसबीर घेतली हातात आणि ओलं लागलं काहितरी हाताला डोळ्यापाशी त्या तसबीरीतल्या गांधीजींच्या डोळ्यापाशी साहेब होतेच शेजारी ऊभे टेंडर काढा.....म्हणाले, सगळ्या तसबीरी बदलून घेऊ

प्रतिक्रिया द्या
2703 वाचन

💬 प्रतिसाद (15)
ज
जेपी Sat, 02/15/2014 - 05:17 नवीन
.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 02/15/2014 - 05:25 नवीन
आशय आणि शेवट आवडला. पण निगरगट्टांना याने काही फरक पडणार नाही.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 02/15/2014 - 05:25 नवीन
बारकावे मस्त टिपलेत.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 02/15/2014 - 06:50 नवीन
चपखल.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sat, 02/15/2014 - 14:27 नवीन
सुप्पर लाईक
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sat, 02/15/2014 - 14:38 नवीन
स्वातंत्र्या नंतरचे भारतातले 'साहेब' आणि 'टेंडर' यांचं नातं उत्तरोत्तर घट्ट झाले आहे. म्हणून जवळचे मित्र गमतीत म्हणतात, '' अरे बाबा जोड्यानं मार पण साहेब नको म्हणू!''
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 02/15/2014 - 14:42 नवीन
नेमकी! आवडली.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sat, 02/15/2014 - 14:52 नवीन
हं! आशय आणि सादरीकरण दोन्ही आवडलं. ते 'हं!'? वस्तुस्थितीला उद्देशून आहे ते!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 02/15/2014 - 15:29 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 02/15/2014 - 16:30 नवीन
पर्फेक्ट!
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sat, 02/15/2014 - 18:03 नवीन
काय छान लिहिली आहे! व्वा!!
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Mon, 02/17/2014 - 03:59 नवीन
मस्त जमलीये. कल्पना व सादरीकरण दोन्ही आवडले!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/17/2014 - 17:44 नवीन
चपखल !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/17/2014 - 17:58 नवीन
आवडून गेल्या आहे...
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 02/18/2014 - 07:37 नवीन
आवडली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा