कॉस्ट कटिंग
कॉस्ट कटिंग हा एक परवलीचा शब्द झालाय सगळीकडे. अनावश्यक खर्च कमी करावेत हे खरंच आणि अनुत्पादक खर्च कमी = नफ्यात वाढ हा ढोबळ अर्थ मला मान्य आहे. पण त्याचा सरसकट वापर आणि मूर्ख अंमलबजावणी वर चर्चा हा ह्या धाग्याचा उद्देश.
(सगळ्यात महत्वाचे : हे सगळे जेव्हा भारतीय लोकं भारतीय लोकांसाठी करतात तेव्हा हि पार्श्वभूमी)
तथापि कॉस्ट कटिंग at what cost असा एक प्रश्न आहे ..
उदा :
१. अत्युच्च पदावरील अधिकाऱ्यांनी उत्तम प्रकारे प्रवास करणे / राहणे आपले हे सोडून रिक्षा तून प्रवास सुमार दर्जाच्या एयर लाईन्स मधून जाणे ते हि एकोनोमीने ...फालतू ठिकाणी वास्तव्य करून आपल्या उत्पादक वेळेचा दर्जा घसरवणे असे होत नही का?
२. एका विशिष्ट वेळी कार्यालयातील दिवे मालविणे / ए सी बंद करणे (भलेही लोकं काम करतातच आहेत)ह्यातील असंवेदनशीलता
३. चहा /कॉफी वगैरे (आधीच असलेल्या) क्षुल्लक खर्चात (आणखीन आणखीन) कमीत कमी किमतीचा माल वापरून नगण्य बचत करणे
३. साध्या टिश्यू पेपर वर नियंत्रणे आणणे
४. हौसिंग कोलोनिंमध्ये आवारातल्या दिव्यांची संख्याच कमी करणे आणि असलेल्या दिव्यांना 'मिणमिण' पातळीवर नेणे.किंवा सामान्य दर्जाचे सुरक्षा रक्षक फक्त कमी पगाराच मिळतात म्हणून ठेवणे..
५. कुठल्याही खर्चा बाबत फक्त आणि फक्त 'कमी' खर्च / किंमत हाच निकष ठेवणे.
६. उत्तम प्रतीच्या गाड्या उन्हाळ्यातही काचा खाली करून ए सी नं लावता चालविणे
म्हणजे एखादी युक्ती (उदा: वीज खर्च कमी करायचा तर दिवे मालाव्न्या पेक्षा सेन्सर्स लावणे)वापरून बचत हा मार्ग नं विचारात घेता (ह्यात एखादा 'नवीन खर्च'असेल तर अब्रम्हण्यम ..) आहे तेच कमी करणे हि मनोवृत्ती..
एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात येते तेव्हा तिची किंमत चुकती करून मग तिचा वापर करणे, तिच्या देखभालीवर खर्च करून ती उत्तम प्रकारे मेंटेन करने हि आपली मानसिकता दिसत नही.
म्हणजे एक वेळ जीवनमानाचा दर्जा कमी झाला तरी चालेल पण अधिकार आले कि 'खर्च' कमी करा हि वृत्ती..मला वाटते कुठल्याही मुलभूत सुविधा/ संशोधन / उदात्त भव्य सुंदर गोष्टींना आपल्या आयुष्यात मिळत असलेले कमी कमी महत्व ह्या पाठीमागे हे चुकीचे कॉस्ट कटिंग तत्वज्ञान हातभार लावते आहे..
विकसित समाजांमध्ये कॉस्ट कटिंग होतेच पण म्हणून जीवनमान कायमचे घसरवले जात नही..किंवा ते तसे घसरले तरी पुन्हा पूर्व पदावर ते आणले पाहिजे अशी मानसिकता असते...
जाता जाता :
ऋणं कृत्वा घृतं पिबेत ह्याचे समर्थन नाहीये किंवा लक्ष्मीच्या किळसवाण्या प्रदर्शनाचा निषेधचं आहे....
प्रतिक्रिया