Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाते आपुले तसेच आतून...

आ — आनंदमयी, Sun, 02/16/2014 - 07:31
जसे फुलावे रंग साजिरे श्यामनिळ्याच्या मोरपिसातून मुके तरी मोहाहुन मोहक नाते आपुले तसेच आतून.. मी मुरली तू सूर खुळासा मी यमुना तू माझी खळखळ तू कविता, मी तुझ्या आतली आर्त खोल दडलेली तळमळ तू कान्हा मी अधीर राधा राघव तू मी तुझी मैथिली नर्तक तू मी नुपुर नादमय छुमछुमणारे तुझ्या पाऊली भेट घडे या वळणावरती अनोळखीशी आज नव्याने वर वर सारे परके तरिही जुळले अंतर जुन्या दुव्याने परस्परांतच परस्परांनी पुन्हा नव्याने जावे गुंतून अनोळखी देहात नांदते नाते आपुले तसेच आतून.. © अदिती जोशी

प्रतिक्रिया द्या
4031 वाचन

💬 प्रतिसाद (20)
च
चाणक्य Sun, 02/16/2014 - 07:57 नवीन
मस्त रचना... एकदम कडक
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sun, 02/16/2014 - 13:04 नवीन
खूप सुंदर आणि आर्त भावपूर्ण कविता! अभिनंदन! असेचछान छान लिहित चला! अशीच एक छान रचना आठवली : युगायुगांचे नाते
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 02/16/2014 - 13:39 नवीन
वा! मस्त!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 02/16/2014 - 17:11 नवीन
वाह! आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 02/16/2014 - 17:12 नवीन
@भेट घडे या वळणावरती अनोळखीशी आज नव्याने वर वर सारे परके तरिही जुळले अंतर जुन्या दुव्याने >>> अजी कत्ल हो गए जी....!!! @परस्परांतच परस्परांनी पुन्हा नव्याने जावे गुंतून अनोळखी देहात नांदते नाते आपुले तसेच आतून.. >>> यहां जी उठे फिर से :)
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Sun, 02/16/2014 - 18:35 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Sun, 02/16/2014 - 19:20 नवीन
सर्वांचे मनापासून आभार!! __/\__ ..........................................................
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Wed, 02/19/2014 - 05:07 नवीन
क्या बात है!!! खूप आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 02/19/2014 - 05:33 नवीन
शेवटच्या २ कडव्यांमध्ये 'चलो इकबार फिरसे अजनबी बन जाये'ची आठवण झाली. छान कविता!
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Wed, 02/19/2014 - 11:36 नवीन
सुंदर ,नादमयी कविता. खूप आवडली.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 02/19/2014 - 12:08 नवीन
आहा!
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Wed, 02/19/2014 - 15:33 नवीन
धन्यवाद.. :)
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 02/21/2014 - 07:21 नवीन
सुरेखच झालीये.....
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 02/22/2014 - 06:18 नवीन
सुंदर, खुपच आवडली :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 02/22/2014 - 06:20 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/22/2014 - 14:57 नवीन
भेट घडे या वळणावरती अनोळखीशी आज नव्याने वर वर सारे परके तरिही जुळले अंतर जुन्या दुव्याने परस्परांतच परस्परांनी पुन्हा नव्याने जावे गुंतून अनोळखी देहात नांदते नाते आपुले तसेच आतून.. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
उ
उपास Sat, 02/22/2014 - 15:05 नवीन
खूप दिवसांनी छान, सोप्पी तरल आणि तरीही सखोल कविता वाचायला मिळाली, नितळ सुंदर!
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Mon, 02/24/2014 - 16:35 नवीन
सर्वांना थँक्स अ लॉट.... :) ..........................................................
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 04/22/2015 - 18:30 नवीन
क्याबात!!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 04/22/2015 - 21:11 नवीन
वा! क्या बात है!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा