दासनवमीनिमित्त “श्री समर्थ चरित्र प्रश्नमंजूषा” सत्र दुसरे
मागील पानावरुन पुढे चालू.... पुढील २५ प्रश्न :
२६ समर्थांचे कृष्णातीरी आगमन झाले ते शालिवाहन शक कोणते ?
२७ कृष्णतीरी समर्थांनी पहिला मारुती कोणत्या गावी स्थापन केला ?
२८ कृष्णातीरावर समर्थ कोणत्या गावी स्थिरावले ?
२९ छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ यांची प्रथम भेट कुठे झाली ?
३० छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ यांची भेट झाली ते शालिवाहन शक कोणते ?
३१ चाफळचे राममंदिर कोणत्या नदीच्या तीरावर आहे ?
३२ चाफळच्या राम मंदिरात स्थापन केलेली मूर्ती कोणत्या नदीच्या डोहात सापडली ?
३३ डोहात सापडलेल्या दुसर्या मूर्तीची स्थापना कोठे केली ?
३४ रामनवमी उत्सवास समर्थांनी कोठे प्रारंभ केला ?
३५ चाफळच्या उत्सवास जेव्हा सुरवात झाली ते शालिवाहन शक कोणते ?
३६ समर्थ संप्रदायाचे नाव काय ? संप्रदायाचा मठ कोणता ?
३७ भारतभ्रमणात समर्थांची व कोणत्या शीख गुरूंची भेट कोठे झाली व ते शालिवाहन शक कोणते ?
३८ समर्थांना महाबळेश्वरास मिळालेले दोन शिष्य कोण ?
३९ समर्थांना कोल्हापुरात मिळालेले दोन शिष्य कोण ?
४० समर्थ शिष्या वेण्णास्वामी व अक्कास्वामी यांच्या गावाचे नाव काय ?
४१ ‘भरल्या घरात रामनाम घेऊ नका’ असे समर्थांना कोण म्हणाले ?
४२ वाई येथे समर्थांनी स्थापित केलेल्या मारूतीचे नाव काय ?
४३ वाईमधील कोणत्या तीन घराण्यातील व्यक्तींना समर्थांनी प्रथम अनुग्रह दिला ?
४४ समर्थ स्थापित अकरा मारूतीपैकी सातारा जिल्ह्यात किती स्थाने आहेत व त्यांची नावे काय ?
४५ समर्थ स्थापित अकरा मारूतीपैकी कोल्हापूर जिल्ह्यात किती स्थाने आहेत व त्यांची नावे काय ?
४६ समर्थ स्थापित अकरा मारूतीपैकी सांगली जिल्ह्यात किती स्थाने आहेत व त्यांची नावे काय ?
४७ एकाच अभंगात अकरा मारूतींचा उल्लेख आहे तो अभंग कुणाचा ?
४८ दास टेकडी कुठे आहे ?
४९ समर्थांचा मठ कोणता ? त्याचा कारभार कोण पहात असे ?
५० कल्याण स्वामींचा मठ कोणता ? तो कोणत्या नदीच्या तीरावर आहे ?
जय जय रघुवीर समर्थ !
प्रतिक्रिया