सत्ता कूणाची ?
आताच विविध वर्तमानपत्रांमधे वाचलेल्या बातम्यांवरुन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या तीन मारेकऱयांची फाशी रद्द करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्यानंतर तामिळनाडू सरकारने या हत्येप्रकरणातील सर्व सात दोषींची सुटका करण्याचा निर्णय घेतला अशी बातमी वाचनात आली.
देशाचे माजी पंतप्रधान व त्यावेळचे काँग्रेसचे सर्वोच्च नेते राजीव गांधी यांच्या मारेकर्यांना शिक्षा देण्यास काँग्रेसप्रणीत केंद्र सरकार अपयशी ठरली आहे असे स्पष्टपणे दिसून येत आहे.
काँग्रेस पक्ष आपल्या सर्वोच्च नेत्याला, सोनिया गांधी आपल्या पतीला आणि राहूल गांधी आपल्या पित्याला न्याय मिळावा म्ह्णून काहीही करु शकले नाहित. अशा लोकांकडून देशाने काय अपेक्षा बाळगायची ?
खरेच या देशात सत्ता कोणाची आहे ???
प्रतिक्रिया