येत्या मराठी भाषा दिनाच्या निमीत्ताने मराठी गायक "अजित कडकडे" यांच्या बद्दल सामुहीक लेखन
नमस्कार; माझ्या अलिकडील मिपा वास्तव्यात मिपाकर अमेय यांच्याकडून मराठी विकिपीडियाकरीता विकिमिडिया कॉमन्सवर मराठी गायक अजित कडकडे यांच प्राप्त झालेल छायाचित्र अशात लावल आहे.
छायाचित्र लावताना मराठी आणि इंग्रजी दोन्ही विकिपीडियावर अजित कडकडेंबद्दल फारतर एक परिच्छेदभर माहिती आहे अस लक्षात आलं. मराठी विकिपीडियावर ३८०० बाईट्सच्या आसपास मजकुर आहे. तर इंग्रजी विकिपीडियावर १२०० बाईट्स मजकूर आहे. विकिपीडियावर किमान वाचनीय माहितीचा आकार चार परिच्छेद किंवा ७००० बाईट्सतरी असावयास हवा.
मराठी भाषा दिन जवळ येतोच आहे आणि एका मिपाकरांनी अजित कडकडेंचे चित्र टाकून छोटी सुरवात केलीच आहे; मग जमले तर येत्या मराठी भाषा दिनाच्या निमीत्ताने सगळ्यांनी मिळून अजून दोन एक परिच्छेद मजकूर जरी जमाकरून सामुहीक पद्धतीने लिहून पाहिला तर एका मराठी गायका बद्दल मराठी आणि इंग्रजी ज्ञानकोशातील माहितीस परिपुर्णता येईल.
२७ तारखे पासून मराठी संकेतस्थळांचा आढावा घेणारी चर्चा व्हावी तसा धागा काढावा असा मानस आहे. तत्पुर्वी येत्या मराठी भाषादिनाच्या निमीत्ताने हा सामुहीक लेखनाचा बेत जुळून आल्यास दुधात साखरेचा गोडवा लाभेल.
नित्या प्रमाणेच विकिपीडियावर वापरण्यासाठी या धाग्यावरील आपले स्वतःचे प्रतिसाद लेखन प्रताधिकार मुक्त म्हणजेच कॉपीराईट फ्री समजले जाईल. अमेय यांचे धन्यवाद आणि प्रतिसादांकरीता आपणा सर्वांना धन्यवाद
मराठी विकिपीडियावरील अजित कडकडे लेखातील सध्याचा मजकुर अजित कडकडे (जन्मदिनांक ११ जानेवारी - हयात) हे मराठी हिंदुस्तानी गायक, पार्श्वगायक आहेत. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे पं. गोविंदराव अग्नी व पं. गोविंदप्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतले. नंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली. अजित कडकडे यांनी सुरुवातीच्या काळात 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र' या संगीत नाटकांतून गाणाऱ्या पात्रांच्या भूमिका केल्या होत्या.इंग्रजी विकिपीडियावरील Ajit Kadkade लेखातील सध्याचा मजकुर :
Ajit Kadkade is a reputed Hindu devotional singer in Maharashtra, India. He learnt Hindustani classical music from the famous singer Jitendra Abhisheki. Ajit specializes in singing Marathi devotional songs (Bhajans), Abhangs, Natya Sangeet, Hindustani classical music etc. He is known for his unique and melodious style of singing.तुम्हाला मिळालेली माहिती तुम्ही तुमच्या शब्दात विकिपीडियावर अथवा येथे देऊ शकता. शक्यतो स्वतःच्या शब्दात लिहा (कॉपीपेस्ट टाळा) जिथे उपलब्ध असेल तिथे संदर्भ नमूद करा. किंवा आपल्याला इतर भाषा येत असतीलतर सध्याच्या माहितीचा हिंदी आणि इतर भारतीय अथवा जगातील कोणत्याही भाषेत अनुवाद करून द्या. या निमीत्ताने एका मराठी माणसाचा आणि संस्कृतीचा परिचय परकीयांना करवला जाऊन मराठीच एक पाऊल पुढे पडण्यात साहाय्य होऊ शकेल. किंवा मराठी विकिपीडियातील गीत संगित प्रकल्पाद्वारे इतरही संगीत विषयक योगदान करण्याचे स्वागतच असेल.
२७ तारखे पासून मराठी संकेतस्थळांचा आढावा घेणारी चर्चा व्हावी तसा धागा काढावा असा मानस आहे. तत्पुर्वी येत्या मराठी भाषादिनाच्या निमीत्ताने हा सामुहीक लेखनाचा बेत जुळून आल्यास दुधात साखरेचा गोडवा लाभेल.
नित्या प्रमाणेच विकिपीडियावर वापरण्यासाठी या धाग्यावरील आपले स्वतःचे प्रतिसाद लेखन प्रताधिकार मुक्त म्हणजेच कॉपीराईट फ्री समजले जाईल. अमेय यांचे धन्यवाद आणि प्रतिसादांकरीता आपणा सर्वांना धन्यवाद
प्रतिक्रिया